विजय सरदेसाईंचं शस्त्रपूजन नाही पाहिलं तर काय पाहिलं?

दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन करण्याचं शास्त्र

Goan Varta Live | प्रतिनिधी

फातोर्डा : आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई हे गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा. दसऱ्यानिमित्त विजय सरदेसाईंनी शस्त्रपूजन केलंय. त्याचे फोटोही त्यांनी फेसबूक शेअर केलेत.

आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं दसऱ्याचा दिवशी पूजन केलं जातं. कम्प्युटर, मोबाईल, कॅमेरा, वही-पुस्तक, सरस्वती, गाडी, बाईक या सगळ्याच पूजन करणारे अनेक फोटो सोशल मीडियात दिसतात. मात्र विजय सरदेसाईंनी केलेलं शस्त्रपूजन खास आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी शस्त्रांचं पूजन केलंय.

ग्रामीण भागात असणारं आर्म नावाची बंदूक विजय सरदेसाईंनी पुजली. तसंच शार्पशूटर जे वापरतात तशी गनही त्यांनी पुजली. दोन रिव्हॉलव्हरचंही विजय सरदेसाईंनी पूजन केलंय. फेसबूकवर फोटो शेअर करत त्यांनी आपण केलेल्या शस्त्रपूजनाची माहिती दिली आहे. विजय सरदेसाई हे फातोर्डाचे आमदार आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद म्हणून काम पाहिलं आहे. गोवा फॉरवर्ड या पक्षाची स्थापना केलेल्या विजय सरदेसाईंनी केलेल्या शस्त्रपुजनाची सोशल मीडियात चर्चा सुरु आहे.

आज पत्रकार परिषद

विजय सरदेसाई हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत भाजपला सोडचिट्ठी किरण कांदोळकर गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

And Ayudha Puja at home ! On this Dussehra May the victory of good over evil inspire you to your own victories. May you all go forward …

Posted by Vijai Sardesai on Sunday, 25 October 2020
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!