VIDEO VIRAL | तालिबानी रमले मुलांच्या पार्कमध्ये !

सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर भयानक परिस्थिती पाहायला मिळत आहे. अक्षरशः थरकाप उडवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अफगाणिस्तानातील अनेक नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचे चित्र दिसत आहे. काही विमानाला लटकून देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर काही कुटुंबीयांसोबत घरात लपून बसले आहेत. अशातच अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवाद्यांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये तालिबानी लहान मुलांच्या पार्कमध्ये खेळताना दिसत आहेत.

सध्या सोशल मीडियावर अफगाणिस्तानमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान एका व्हिडीओमध्ये तालिबानी लहान मुलांच्या पार्कमध्ये खेळताना दिसत आहेत. काहीजण घोड्यावर बसून आनंद घेत आहेत तर काही इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये बसून मस्ती करताना दिसत आहे. तालिबानी हातात हत्यारे घेऊन असल्याचे दिसत आहे. त्यांचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

यापूर्वी काबुल विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल झाले होते. या व्हिडीओमध्ये तेथील नागरिक देश सोडण्यासाठी करत असलेली धडपड दिसत होती. अमेरिकी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या लष्करी विमानात जबरदस्तीने चढताना खाली कोसळल्याने आणि विमानतळावर रेटारेटी झाल्याने मनुष्यहानी झाली. एकाच वेळी शेकडो लोकांनी जबरदस्तीने अमेरिकी लष्करी विमानात घुसण्याचा प्रयत्न केला असता प्रचंड रेटारेटी झाली. विमानतळ रिकामा करताना त्यात सात जणांचा मत्यू झाल्याचे अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. तर विमानतळावरून पाच मृतदेह हलवताना पाहिल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, या पाच जणांचा मृत्यू गोळीबारात झाला की चेंगराचेंगरीत हे कळू शकत नाही, असे दुसऱ्या एका नागरिकाने सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!