VIDEO | वास्को अमर नाईक खून प्रकरण: दोन संशयितांना अटक

दोन्ही संशयित हे मूळ उत्तरप्रदेशचे; सुपारी घेऊन हा खून केला असल्याचं समोर

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

वास्कोः गुरुवारी ईसोर्शी – बोगमाळो येथे गोळी झाडून अमर नाईक यांचा खून करणाऱ्या दोन्ही संशयितांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आलीये. मोठ्या प्रमाणात केलेल्या पोलीस शोध मोहिमेत दोन्ही संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. १२ तासांच्या आत पोलिसांनी हत्येचा छडा लावसाय. सुपारी घेऊन हा खून केला असल्याचं समोर आलं. पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही संशयित हे मूळ उत्तरप्रदेशमधील असल्याची माहितीही मिळतेय. दरम्यान पुढील पोलीस तपास सुरू असल्याची माहिती वास्को पोलिसांकडून देण्यात आलीये. दोन्ही संशयित आरोपींना वास्को पोलीस रिमांडसाठी नेत असतानाची Exclusive दृश्यं…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!