Video | पिकनिकसाठी गेले होते, दोघे नदीत बुडाले!
Goan Varta Live | प्रतिनिधी
फोंडा : दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी कोडार येथे सहलीसाठी गेलेल्या सात अल्पवयीन विद्यार्थ्यांपैकी एक युवक आणि युवती नदीपात्रात बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. फोंडा पोलीस आणि अग्निशमन दलाने सायंकाळी उशिरांपर्यंत त्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत.

दहावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी चार युवक आणि तीन युवतींचा एक गट कोडार येथे सहलीसाठी गेला होता. तेथील नदीपात्रात मौजमजा केल्यानंतर दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास नदीपात्रातून बाहेर येताना सानिया मुल्ला (१६, रा. दीपनगर-कुर्टी) ही युवती पाय घसरून पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी प्रदीप मलंवर (१७, रा. पिसगाळ-प्रियोळ) हा गेला असता पाण्याच्या प्रवाहात दोघेही वाहत गेले. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान तेथे दाखल झाले. मात्र, ते सापडले नाहीत. दरम्यान, फोंडा पोलिसांनी उर्वरित तीन युवक आणि दोन युवतींना उसगाव पोलीस चौकीत ठेवले असून त्यांची चौकशी सुरू आहे.