VIDEO | पर्यटकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा! कळंगुटमधील गर्दीनं चिंता वाढवली

कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगला फार महत्त्व

Goan Varta Live | प्रतिनिधी

कळंगुट : राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कळंगुट किनाऱ्यावर गेल्या दोन दिवसांपासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. या वाढत्या संख्येसोबत सोशल डिस्टन्सिंगचे मात्र तीन तेरा वाजल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येनं आलेल्या अनेक पर्यटकांकडून मास्कही घातले जास्त नसल्यानं चिंता व्यक्त केली जाते. पर्यटकांच्या बेजबाबदार वागण्यानं कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. आमचे प्रतिनिधी नारायण पिसुर्लेकर यांनी काढलेला या व्हिडीओनं पर्यटकांमध्ये कोरोनाचं कोणतंही भय उरलेलं नसल्याचं अधोरेखित केलंय. आश्चर्याची बाबा म्हणजे राज्यात यूकेहून आलेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह आढळत असलेल्यांची संख्या वाढतेय. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. अशातच कळंगुट किनाऱ्यावरील ही गर्दी सगळ्यांना घाबरवणारी अशीच म्हणावी लागेल.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!