Video Share करत DGP यांनी दिला दिवंगत पोलिस उपअधीक्षक उत्तम राऊत देसाईंच्या आठवणींना उजाळा

पोलिस अपअधीक्षक उत्तम देसाई यांचं कोरोनामुळे निधन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांचे मंगळवारी रात्री बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर काही महिन्यांपूर्वीच हृदय शस्त्रक्रिया झाली आली होती. एक महिन्यापूर्वी आजारी पडल्याने त्यांना गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. ते पणजी उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी ते निवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा, असा परिवार आहे.

हेही वाचा : Crime | मास्कवरुन राडा! सुपरमार्केटमधील CCTV समोर

दरम्यान, पोलिस अपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या आठवणींना खुद्द डिजीपींनीही व्हिडीओ शेअर करत उजाळा दिलाय. कोविडच्या महामारीत जनजागृती करण्यासाठी उत्तम देसाई हे नेहमीच आघाडीवर होते, असं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या जाण्याचं निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन निघणार नाही, असं म्हणत डिजीपींनीही उत्तम देसाईंच्या निधनावर दुःख व्यक्त केलंय. दरम्यान, उत्तम देसाईंचा जनजागृती करतानाचा एक व्हिडीओही डिजीपींनी शेअर केला आहे. उत्तम राऊत देसाईंच्या निधनामुळे गोवा पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

एक धाडसी पोलिस अधिकारी अशी त्यांची ख्याती होती. कोविडच्या पहिल्या लाटेवेळी त्यांनी लोकजागृतीसाठी मोठे काम केले होते. विशेष म्हणजे लोकांना घराबाहेर पडू नका तसेच मास्कचा वापर आणि हात स्वच्छ धुण्याबाबतचा संदेश त्यांनी स्वतः गाऊन दिला होता. या व्यतिरीक्त त्यांचा जनतेला आवाहन करणारा संदेशही सोशल मिडीयावर बराच व्हायरल झाला होता. त्यांना इतर आजारांचा त्रास होता आणि त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. गोव्याचे डिजीपी कुमार मिणा यांनी आपल्या ट्वीट संदेशात ते कोविडचे बळी ठरल्याचे म्हटलंय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!