Video | Scootyचा अपघात, तरुणाचा On the Spot मृत्यू

राज्यात अपघातांची मालिका सुरुच!

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा : राज्यातील अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. दुचाकीच्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडलीये.

काळी माती भोम इथं हा भीषण अपघात घडलाय. या अपघाता दुचाकीस्वार जागीच दगावलाय. दरम्यान, दुचाकीस्वार हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो कुंडई इथं राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. सुनील विजय गुप्ता असं मृत दुचाकीस्वाराचं नाव आहे. त्याचं वय 22 वर्ष होतं. या अपघातात काळानं या 22 वर्षीय तरुणावर घाला घातलाय. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या अपघातामुळे पणजी-फोंडा मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.

पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. वाढत्या अपघातांनी रस्ते वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनू लागलाय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!