Video | जानेवारीत चक्क हिवसाळा! राजधानी पणजीसह सर्वदूर जोरदार पाऊस

Goan Varta Live | प्रतिनिधी
फोंडा : राज्यात येत्या तीन दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, फोंड्यामध्ये संध्याकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा लोकांना सहन करावा लागतोय. अशातच झालेल्या जोरदार पावसानं हवामानात काहीसा गारवा निर्माण झालाय.
फोंड्यासह कुडचडे, केपे, मडगावामध्ये मुसळधार पाऊस झालाय. तर दुसरीकडे राजधानी पणजीसह सर्वदूर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. अचानक झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडवली आहे. राजधानी पणजीमध्ये संध्याकाळी ६- ६-३०च्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्याआधीच पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली होती.
राज्याच्या अनेक भागांमध्ये ऐन थंडीत पावसाच्या सरी बरसु लागल्यात. ऐन थंडीत येऊन धडकलेल्या या अवकाळी पावसामुळे हिवसाळा अनुभवायला मिळतोय. गेल्या काही दिवसांत गोव्यासह कोकणात पावसाचं आगमन झालंय. या अचानक आलेल्या पावसामुळे सगळेच गोंधळेत. गोव्याच्या उत्तर तसंच दक्षिण भागात गेल्या २४ तासांत हलक्या सरींची नोंद झालीये. त्यामुळं रस्ते ओलेचिंब झालेत आणि वातावरणात गारवा निर्माण झालाय. गोव्याच्या राजधानीतही असंच काहीसं चित्र आहे.
पाहा व्हिडीओ-
हेही वाचा – राज्यासह या भागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज
दुसरीकडे अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. आंबा आणि काजू पिकांना या पावसामुळे फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. पेडण्यास पर्वरी, पणजीसह संपूर्ण राज्यातच अवकाळी पावसाच्या सरी बरसत असल्यानं शेतकरी हवालदिल झालेत.