Video | सरकारच्या नाकावर टिच्चून ‘इथं’ सुरु आहे मासळी बाजार!
खरंच कोरोनाचं भय राज्यात उरलंय का?
Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : राज्यात कर्फ्यू सुरु आहे. मासळी बाजारांवरही बंदी आहे. जमावबंदीचा कायदा लागू आहे. मात्र या सगळ्याला केराची टोपली दाखवली जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ठिकाण आहे, मडगाव.
मडगावातील SGPDA होलसेल मार्केट बंद असल्याने दवर्ली हाऊसिंग बोर्ड येथे मासळी एजंटकडून समांतर मासळी मार्केट सुरू आहे. याठिकाणी कोविडच्या नियमांचं पालन अजिबात होताना दिसत नाही. लॉकडाऊनमध्ये सुरू असलेला हा प्रकार धक्कादायक आहे. लोकही मासे खरेदीसाठी इथं येत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. त्यामुळे आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा : अभिमानास्पद! गोवा जलतरणपटू संजना प्रभुगावकरचा नवा विक्रम
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.