Video | मास्कवरुन राडा! कांदोळीच्या सुपरमार्केटमधील CCTV समोर

बाचाबाची प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : कांदोळीतील एका सुपरमार्केटमधील सीसीटीव्ही तुफान वायरल झालंय. कांदोळीतल्या एका सुपरमार्केटमध्ये परदेशी महिलेनं सुपरमार्केटमधील कर्मचारी महिलेशी हुज्जत घातल्यानंतर प्रचंड राडा झाला. या सुपरमार्केटमधील कॉम्प्युटर, कार्डमशीनसह काही गोष्टींचं नुकसानही झालं. याप्रकरणी पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आलीये.

नेमका काय प्रकार?

एक सीसीटीव्ही समोर आलं आहे. या सीसीटीव्हीमध्ये एक परदेशी महिला मास्क न घातला वावरत असल्याचं दिसतंय. यादरम्यान, एक काऊंटरवर उभी असणारी एक महिला तिला मास्कबाबत विचारणा करत असल्याचं पाहायला मिळालंय. यानंतर परदेशी महिलेला अचानक राग येतो आणि ती बाचाबाची करु लागल्याचं पाहायला मिळते. या सगळ्यात बाचाबाचीचं रुपांतर तुफान राड्यात होतं.

परदेशी महिला आपल्या हातात असलेल्या बॅगनेच काऊंटरवर असलेल्या गोष्टींवर सगळा राग काढते. यात सुपरमार्केटच्या काऊंटरवर असलेल्या कॉम्प्युटर आणि क्रेडिट कार्ड चार्जिंग मशिनची तोडफोड झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलंय. दरम्यान, यानंतर सुपरमार्केटच्या बाहेर पडल्यानंतर काऊंटरवर असलेली महिला आणि परदेशी महिला यांच्या बाचाबाची झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. हा सगळा राडा झाला, तो मास्क न घालण्याच्या वादावरुन. या परदेशी महिलेसोबत सुपरमार्केटमध्ये राडा झाला, ती महिला रशियन नागरीक असल्याचं बोललं जातंय.

पुढे काय?

या प्रकरणी सुपरमार्केटमधील लोकांकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकूण २ लाख रुपयांचं नुकसान या राड्यात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस आता याप्रकरणी अधिक तपास करुन या तपासातून काय नेमकी माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचंय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!