Video | भाटले-चिंचोळेतील Street Light डिस्को लाईटसारखं का काम करतेय?

स्ट्रीट लाईट नीट काम करत नसल्यानं वाहनचालकांना त्रास

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : भाटले-चिंचोळे रस्त्यावरील दिवे एखाद्या पबमध्ये किंवा डिजेने लावलेल्या लाईटप्रमाणे काम करत असल्याचं पाहायला मिळालंय. गंमतीचा भाग सोडा, पण स्ट्रीट लाईट्स ज्या पद्धतीनं चालू-बंद होत आहेत, ते पाहून वाहनचालकांना तर त्रास होतो आहेत, शिवाय या रस्त्यावरुन जाणाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय.

भाटले चिंचोळे मार्गावरील हे दिवे दुरुस्त करण्याची मागणी केली जाते आहे. तातडीनं जर या दिव्यांच्या दुरुस्तीचं काम केलं गेलं नाही, तर या चालू-बंद होणाऱ्या दिव्यांमुळे एखादा अपघात घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, रस्त्यावरील या दिव्यांची दुर्दशा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आधीच राज्यातील अपघातांचं सत्र कमी झालेलं नाहीये. शनिवारीही सकाळी दोना-पावलाच्या दरम्यान, एका कारचा अपघात झाल्याचं समोर आलं होतं. दुसरीकडे स्ट्रीट लाईट्स अशा प्रकारे काम करणार असतील, तर त्यामुळे अपघातांना एक प्रकारे आमंत्रण मिळेल, असं बोललं जातंय. त्यामुळे तातडीनं या दिव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरतेय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!