VIDEO | अडवई सत्तरीत घर जमीनदोस्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

सत्तरीः संपूर्ण गोव्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय. धुव्वाधार पावसानं सत्तरीला अक्षरशः झोडपून काढलंय. सत्तरीतील अनेक गावामधील जनजीवन मुसळधार पावसामुळे प्रभावित झालं आहे. तर काही ठिकाणी विजेचाही खेळखंडोबा पाहायला मिळालाय. दुसरीकडे सत्तरी तालुक्यातून वाहणाऱ्या सर्वच नद्यांनी रौद्ररुप धारण करायला सुरुवात केली आहे. मुसळधार पावसाने म्हादई नदीच्या पाणी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं अनेक गावांना फटका बसलाय. अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर या वादळी पावसाने हिरावून घेतलंय. अशातच अडवई सत्तरीतील एक घर पाहता पाहता जमिनदोस्त झालंय. पहा व्हिडिओः

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!