Video | पेडणे तालुक्यातील कोरगावातील या वाड्यात वारंवार बिबट्याची हजेरी!

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद

मकबूल | प्रतिनिधी

पेडणे : उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात बिबट्या दिसून आलाय. कोरगावात वेगवेगळ्या वेळी बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पेडणे तालुक्यातील कोरगावात मानसीवाडा इथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या दिसून आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वेगवेगळ्या वेळेला बिबट्या कॅमेऱ्यात कैद झालाय. सोमवारी पहाटे दोन वाजून पंचवीस मिनिटांनी बिबट्याचा वावर आढळून आलाय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची छबी टिपली गेली आहे.

दरम्यान, बिबट्या आढळून येण्याची ही काही पहिलच वेळ आहे अशातला भाग नाही. याआधीही अनेकदा बिबट्या याच ठिकाणी आढळून आलेला. त्यावेळचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. रविवारी रात्री पावणे माराच्या सुमाराही बिबट्याच याच ठिकाणी आढळून आला होता.

त्याआधी 22 सप्टेंबरलाही बिबट्या आढळून आल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येतंय. दरम्यान, त्याआधी 7 ऑगस्टला रात्री 12 वाजता आणि 24 एप्रिललाही बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नेमक्या याच ठिकाणी आढळून आल्याचे व्हिडीओही समोर आलेत.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!