Video | दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया गोव्यात! आपची रणनिती ठरवण्यासाठी खास दौरा

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया गोव्यात दाखल झाले आहे. गोव्यातील आपच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत. आगामी निवडणुकांसाठी आपची रणनिती ठरवण्यासाठी मनिष सिसोदिया यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो आहे.

हेही वाचा – आपनं भोपळा फोडला!

आपची गोव्यावर नजर

दिल्लीत दुसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर आप गोव्यात सक्रिय झाली आहे. आपचे स्थानिक नेते सातत्यानं सरकारवर आणि सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिट्ठी देत काँग्रेसच्या धडाडीच्या प्रतिमा कुतिन्हो यांनीही आपचा हात हातात घेतलाय. तळागाळातील मतदारांशी संपर्क करण्याचे प्रयत्न झेडपी निवडणुकीपासून आपकडून सुरु झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, झेडपीत खातं उघडल्यानंतर आप आता विधानसभा निवडणुकांच्याही तयारीला लागली आहे.

हेही वाचा – आपची ताकद वाढली! बाणावली येथील नागरिकांचा आम आदमी पक्षात प्रवेश

मनिष सिसोदियांच्या दौऱ्याला महत्त्व

शनिवारी घेतलेल्या पत्रकार परीषदेत मनिष सिसोदिया यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केली होती. एकीकडे मोदींच्या आवाहनानंतर टीका उत्सव सुरु केलेला असतानाच सिसोदिय यांनी मोदींवर निशाणा साधला होता.

हेही वाचा : काँग्रेसची ‘प्रतिमा’ आपमध्ये विलीन

लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोदींनी केजरीवाल यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असा टोला सिसोदिया यांनी शनिवारी केलेल्या पत्रकार परिषदेत लगावला होती. केजरीवाल दे देशातील एकमेव असे नेते आहेत, त्यांना देशाबद्दर दूरदृष्टी आहे, आणि त्यांना सर्वसामान्यांच्या समस्या आणि गरजांची जाणीव आहे, असं वक्तव्य मनिष सिसोदिया यांनी केलं होतं.

शनिवारच्या या पत्रकार परिषदेनेतर आगामी निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी मनिष सिसोदिया गोव्यात दाखल झालेत. त्यांचं गोव्यातील स्थानिक आपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी दणक्यात स्वागतही केलं. गोवा दौऱ्यादरम्यान सिसोदिया नेमकी काय रणनिती आपच्या स्थानिक नेत्यांसाठी ठरवून देतात, हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान गोव्यात येताच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मनिष सिसोदिया काय म्हणाले, तेही ऐका..

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – अंधश्रद्धेचा कहर! जन्मदात्यांनी महिन्याचे मूल मंदिराला केले दान

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!