Video | CZMP | आत्ताच्या आत्ता जनसुनावणी रद्द करा आणि नव्यानं जनसुनावणी घ्या- कामत

CZMPच्या जनसुनावणीवर कामतांची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : पणजीच्या कला अकादमीमध्ये सीझेडएमपीच्या जनसुनावणीमध्ये प्रचंड तणाव सकाळपासून पाहायला मिळाला. तर मडगावच्या रविंद्र भवनातही घेण्यात आलेल्या सुनावणीतमध्ये वादळी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. या जनसुनावणीवरुन चौफेर टीका सामान्यांकडून करण्यात येते आहे. अशातच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या जनसुनावणीवर घणाघाती टीका करत ही सुनावणी तातडीनं थांबवून नव्यानं पुन्हा जनसुनावणी घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी विरोधी पक्षांचे इतरही आमदार उपस्थित होते. जनसुनावणीमध्ये प्रत्येक वक्त्याला आणि त्याच्या मताला किंमत देण्याचं काम प्रशासनानं चोखपणे राबवलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय. त्यासाठी ही प्रक्रिया पुन्हा नव्यानं केली पाहिजे, अशी आग्रही भूमिका दिगंबर कामत यांनी यावेळी मांडली.

पाहा दिगंबर कामत काय म्हणाले?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!