Video | कोरोनाची आकडेवारी, कोरोना बळींच्या आकडेवारीचा घोळ आणि इतर महत्त्वाचं

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

राज्यात बुधवारी सर्वाधिक कोरोना बळींची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बळींचा आकडाही आता पंधराशेच्या जवळ जाऊन पोहोचला आहे. आजच्या मेडिकल बुलेटीनमध्ये 71 मृत्यूंची नोंद आहे. पण अनेकांच्या मृत्यूची तारीख एप्रिलची दाखवली आहे. त्यामुळे मृत्यू नोंद करण्याच्या या घोळावरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. गेल्या 24 तासात सुमारे 67 जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो आहे. तर चुकीचा तपशील दिला जात असल्याचा आरोपही केला जातोय.

गेल्या २४ तासांत राज्यात नव्यानं ३ हजार ४९६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे २ हजार १९२ रुग्ण कोरोनातून बरेही झाले आहे. दरम्यान, राज्यात एकूण कोरोना बळींचा आकडा आता १ हाजर ४४३वर पोहोचल आहे. यासोबत महत्त्वाच्या कोरोना अपडेट्स जाणून घेण्यास पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!