Video | शिमगोत्सवाचा प्रश्न टाळून मुख्यमंत्र्यांची कलटी! #Shimgo

शिमगोस्तवाच्या प्रश्नावर निरुत्तर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात कोरोनाच्या सावटात मुख्यमंत्र्यांना शिमगोत्सवाचा प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यावर उत्तर देणं मुख्यमंत्र्यांनी सोयीस्कररीत्या टाळलंय. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यासंख्येनं रुग्ण वाढत आहेत, त्या पार्श्वभूमीवर गोवन वार्ता लाईव्हचे प्रतिनिधी रुपेश राऊत यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शिमगोत्सवावर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र प्रश्न टाळून मुख्यमंत्री कलटी मारल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय.

हेही वाचा – सचिन तेंडुलकरही कोरोना पॉझिटिव्ह, कुटुंबीयांना लागण नाही

हेही वाचा – सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची होणार तपासणी?

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिमगोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इतरही उत्सवांवर मर्यादा घालण्यात आल्यात. अशात हुनर हार्ट प्रदर्शनावेळी मुख्यमंत्र्यांवर शिमगोत्सवावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. खरंतर पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री कॅमेऱ्यासमोर उभे राहिले खरे. पण प्रश्न ऐकताच त्यांनी निघून जाणंच पसंत केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – चिंताजनक! राजधानीत कोरोनाचा वाढता प्रसार

हेही वाचा – सर्व आमदारांनी कोरोना टेस्ट करा, विधिमंडळ सचिवांचे आदेश

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!