Video | कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर, नोकऱ्यांबाबत घेतला ‘हा’ निर्णय

तरुणांना मंत्र्यांसोबत काम करण्याची संधी मिळणार

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : बुधवारी म्हणजेच उद्या २४ मार्च रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी आज कॅबिनेट बैठक घेण्यात आली. या कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीतील महत्त्वाचे निर्णय कोणते होते, याची माहिती दिली.

मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय?

मुख्यमंत्री फेलोशीप योजना सुरू. एमबीए किंवा पदव्युत्तर झालेल्या २० जणांना मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये फेलो म्हणून काम करता येईल.

कला अकादमीच्या दुरुस्तीसाठी ५० कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव मंजूर.

काणकोण, सांगेतील काही घरांना वीज जोडण्या देण्याचा प्रस्ताव मंजूर.

उद्या अडीच विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील.

नोकरीची संधी

मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यात काही तरुणांना मंत्र्यांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. एमबीएस तसंच पदवीधर तरुणांसाठी २ विभागात शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यातून २० तरुणांना मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये आणि वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम करण्याची संधी दिली जाईल. यासाठी १० हजार आणि ३० हजार अशा २ क्षेणींमध्ये वेतन दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितलंय.

त्यासोबत कला अकादमीच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी रुपये खर्चिले जाणार आहेत. काणकोण, सांगेमधील घरांना वीज जोडणी देण्याबाबतचा प्रस्तावही यावेळी मंजुर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – प्रथमेश ह्यां मात तुजा चुकलांच! पेडणेकर आक्रमक

हेही वाचा – ट्रकच्या मागून स्कूटर घुसली!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!