VIDEO Breaking | वास्को रेल्वे स्थानकाबाहेर तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

कडक निर्बंधांमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

वास्को : वास्कोत सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. वास्को मोठ्या संख्येनं मजूर, कामगार वर्ग आपल्या घरी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर एकवटल्याचं चित्र पाहायला मिळालंय. यावेळी झालेल्या तोबा गर्दीनं सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजवले आहे.

वाढत्या कोरोनात सोशल डिस्टन्सिंग, मास्क याला अनन्यासाधारण महत्त्व प्राप्त झालंय. मात्र ज्या प्रमाणे गर्दी वास्को रेल्वे स्थानकाबाहेर पाहायला मिळाली आहे, ती पाहून कुणाच्या मनात धडकी भरेल. दुसरीकडे राज्यात ७१ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर रुग्णवाढही जवळपास साडे तीन हजाराच्या जवळपास नोंदवण्यात आली आहे. या वाढत्या रुग्णवाढीच आणि मृत्यूदराच्या चिंतेत वास्को रेल्वे स्थानकाबाहेर बुधवारी झालेल्या गर्दीनं अनेक सवाल उपस्थित केलेत. स्थानिक पंचायतींनी कडक निर्बंध लादून लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांनी आपल्या घरचा रस्ता पुन्हा एकदा धरलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!