ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचं निधन

साहित्य क्षेत्रावर शोककळा

उमेश बुचडे | प्रतिनिधी

कणकवली : ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, गझलकार आणि अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष, सिंधुदुर्गाचे सुपुत्र मधुसूदन नानिवडेकर यांचे रविवारी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रतिभावंत कवी, साहित्यिक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नानिवडे येथील असलेले मधुसूदन नानिवडेकर हे सध्या कणकवली तरळे येथे वास्तव्यास होते. मनमिळावू व हसतमुख, विनोदी स्वभावामुळे अनेकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. यामुळे त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा होता. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच साहित्य आणि माध्यम क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!