काँग्रेस वरिष्ठ नेते कॅप्टन सतीश शर्मा यांचं निधन

आजारपणामुळे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार कॅप्टन सतीश शर्मा यांचं बुधवारी गोव्यात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.

शर्मा राजीव गांधींचे निकटवर्ती

पी. व्ही. नरसिम्हा राव यांच्या सरकारमध्ये कॅप्टन सतीश शर्मा राजीव गांधींचे निकटवर्तीय होते. कॅप्टन सतीश शर्मा यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय देण्यात आलं होतं.

रायबरेली- अमेठीया मतदारसंघातून लोकभेवर

आंध्रप्रदेशमधील सिकंदराबादमध्ये ११ ऑक्टोबर १९४७ रोजी कॅप्टन सतीश शर्मा यांचा जन्म झाला होता. शर्मा हे व्यावसायिक वैमानिक होते. राजीव गांधींमुळे ते राजकारणात आले. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ मध्ये शर्मा अमेठीमधून निवडून आले होते. १९९८ ते २००४ दरम्यान शर्मा रायबरेलीमधून खासदार होते. नंतर सोनिया गांधींसाठी त्यांनी ती जागा रिक्त केली. यानंतर २००४ ते २०१६ दरम्यान राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचं नेतृत्व केलं.

आजारपणामुळे निधन

कॅप्टन सतीश शर्मा यांना कॅन्सर झाला होता. सोबतच ते आजारीदेखील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी नवी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कॉंग्रेस नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!