वेर्णा अपघातात दोघे ठार

वेर्ण्याहून मडगावला जाताना अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: राज्यात एका बाजूने कोरोना महामारीचं संकट तर दुसऱ्या बाजूने अपघातांचं सत्र सुरू आहे. दोन्ही बाजूंनी लोकांचा बळी जातोय. सोमवारी सकाळी राज्यात अजून एक अपघात घडलाय. अपघात मोठा भीषण होता. या अपघातात दोघांना मरण आलंय. त्यामुळे परिसरतून हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

हेही वाचाः अर्भक कचराकुंडीत फेकणारी माता सापडली

कुठे झाला अपघात?

वेर्णा औद्योगिक वसाहत परिसरात सोमवारी सकाळी सहाच्या दरम्यान एक भीषण अपघात झालाय. या स्वयं अपघातात मुंडल नाराह (२६) आणि राजकुमार नाराह (२७) या दोन्ही आसामी युवकांचा मृत्यू झालाय.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात १०२ दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली

वेर्ण्याहून मडगावला जात असताना अपघात

मायणा कुडतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार आणि मुंडल हे दोघेही मित्र आपल्या दुचाकीने वेर्णाहून मडगावच्या दिशेने जात होते. दरम्यान, वेर्णा औद्योगिक वसाहत परिसरात पोहचले असता चालकाचा तोल गेल्याने ते दोघेही रस्त्यावर फेकले गेले. रस्त्यावर फेकले गेल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत दोघांनाही हॉस्पिटलात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

हेही वाचाः तरुणीला वाचवण्यासाठी युवकाची मांडवीत उडी

राजकुमार हा वेर्णात राहत होता, तर मुंडल हा नावेली येथे राहत होता. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!