राज्यात भाजीचे दर वाढण्याची शक्यता

मुसळधार पावसाचा भाजी उत्पन्नावर फटका

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गेल्या आठवड्यात पावसाने जणू कहरच केला. निसर्गाचं रौद्ररुप या आठवड्यात प्रत्येकानेच अनुभवलं. राज्यात तसंच आजुबाजूच्या राज्यांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे सगळ्याच गोष्टींचं नुकसान झालं. गोवा-बेळगाव मार्गावरीन अनमोड, चोर्ला, रामनगर, फोंडा या घाटांमध्ये पडझड झाली, दरडी कोसळल्याने बेळगावातून गोव्यात येण्याचे मार्ग बंद झाले. तसंच वादळी आणि मुसळधार पावसात भाजीचं उत्पन्नही खराब झालंय. यामुळे भाजीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून याचा परिणाम भाजीच्या दरांवर झाला आहे.

हेही वाचाः द अ‍ॅक्सिडेंटल जर्नालिस्ट’चे उद्या प्रकाशन

काही दिवसांत भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता

आत्तापासूनच काही भाज्यांचे दर वाढले आहेत. काही दिवसात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं भाजी विक्रेत्यांकडून सांगितलं जातंय. वाहतुकीवेळी पावसामुळे भाज्या कुजण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे बाजारात काही भाज्यांचे दर गगनाला भिडण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात भेंडी, कारली, आलं, मिरचीचे दर १० ते २० रुपयांनी वाढले आहेत. मुसळधार पावसामुळे गेले काही दिवस भाजी व ग्राहक कमी झालेत.

हेही वाचाः नुकसानीची पहाणी केली; मदत कधी?

टोमॅटोही महागला

कांद्याच्या पाठोपाठ आता टॉमेटोही महागला आहे. पावसामुळे भाजीचे ट्रक अनियमितपणे येत असल्यानं ही दरकट वाली आहे. बाजारात सध्या टोमॅटो ४० रुपये किलो या दराने मिळत आहे. टॉमेटो महागला असला, तरी अन्य भाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. भाजी घेऊन बेळगावहून येणारे ट्रक नियमितपणे येण्यास सुरुवात होताच भाज्यांच्या किमती उतरतील असं सांगितलं जातंय. काही दिवसांपासून बेळगाव तसंच कोल्हापूर येथे पडत असलेल्या जोरदार पावसामुळे विशेषकरुन कांदा तसंच अन्य भाजीपाल्यांचं नुकसान झालंआहे. त्यामुळे कांदा प्रतिकिलो ४० रुपये इतका झाला आहे. स्थिती कायम राहिल्यास कांदा आणखी महाग होऊ शकतो.

हेही वाचाः तळर्ण रस्ते उखडले, प्रशासनाचा पत्ताच नाही

दरड कोसळल्याने घाटमार्ग वाहतूकीस बंद

गोव्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चोर्ला तसंच अनमोड घाटात दरड कोसळून रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. त्यामुळे बेळगावहून भाजी घेऊन येणारे ट्रक राज्यात येऊ शकले नसल्यानं बाजारात भाज्यांची आवक घटली. परिणामी त्यांच्या किंमतीत किंचित वाढ झाली. मात्र आता पावसाचा जोर ओसरल्याने शनिवारपासून भाज्यांचे ट्रक राज्यात दखल होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या दररोज चार ट्रक येत आहेत. दरम्यान, बाजारात गावठी भाज्याही मिळत असून त्यांचेही दर स्थिर आहेत.

हेही वाचाः .. अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा

बाजारात भाज्यांचे दर

भाजीदरभाजीदर
काकडी30गाजर60
दोडगी60कांदा35
कोबी25बटाटे30
आले100भेंडी50
हिरवी मिरची90कारली60
दुधी भोपळा30मटार80
शिमला मिरची50चिटकी60

हा व्हिडिओ पहाः Video | Curfew | जुलै महिन्याच्या शेवटही कर्फ्यूतच होणार!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!