वास्को दामोदर सप्ताह यंदा मर्यादित स्वरुपात

कोरोना महामारीमुळे उत्सवाचं स्वरुप मर्यादित

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः वास्को येथील पारंपरिक शेकडो वर्षांची परंपरा असलेला श्री दामोदर देवाचा सप्ताह गेली दोन वर्षं कोवीड महामारीमुळे मर्यादित स्वरुपात साजरा करावा लागत आहे. फक्त मंदिर समिती सभासद, जोशी कुटुंबातील व्यक्ती आणि मोजकीच भजन मंडळी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होती. 

हेही वाचाः ‘भांगराळे गोंय’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून कार्य कराः पिल्लई

दुपारी 12 वा. कार्यक्रमाला सुरुवात

दुपारी १२ वाजता प्रथम जोशी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य प्रशांत जोशी यांनी पुरोहित यांच्या मंत्राक्षतांनी नारळ पुजनाने वार्षीक सप्ताहाची सुरुवात केली. तदनंतर भजनाची सुरुवात अशोक मनोहर मांद्रेकर यांनी केली. अभंग सादर केल्यानंतर दिंडी सम्राट बाबू गडेकर यांनी अभंग सादर केला. पुढे नरेंद्र तोरस्कर, सतीश धुरी आणि शशिकांत उसगांवकर यांनी एकूण पाच अभंग सादर केले. त्यांना संवादिनी साथ मास्तर अनिल कोंडुरकर यांनी दिली, तर पखावज साथ संगीत शिक्षक सुर्या शेटये आणि विनोद मयेकर यांनी दिली. 

हेही वाचाः PHOTO STORY | वाहतूक कोंडीसह अपघाताची भीती; भटक्या गुरांची संख्या वाढती

आभासी पद्धतीने साखळी भजन

त्यानंतर साखळी भजन आभासी पद्धतीने सुरु झाले. हे भजन शनिवारी दुपारी २ वाजता सुरु झाले असून १५ ऑगस्ट दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्याचे प्रसारण युट्युब चॅनलवरुन पहायला मिळेल, अशी माहिती श्री देव दामोदर मंदिर उत्सव समिती अध्यक्ष जगदीश दुर्भाटकर यांनी दिली. या २४ तासांच्या भजन कार्यक्रमात २४ विविध पथके भाग घेतील, असं ते म्हणालेत.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | ELECTION COMMISSION | निवडणूक अधिकारी लागले विधानसभा निवडणुकांच्या तयारीला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!