वास्को-चेन्नई रेल्वे सेवा सुरू

सदर रेलसेवा २६ ऑगस्ट ते ९ सष्टेंबरपर्यंत सुरू राहणार

दयानंद राणे | प्रतिनिधी

वास्को: दक्षिण पश्चिम रेल्वेने गुरुवारपासून सुरु केलेल्या वास्को ते डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल या रेलसेवेच्या पहिल्या दिवशी वास्को रेल्वे स्थानकातून सुमारे तीनशे प्रवाशी गेल्याची माहिती स्थानक प्रमुख गुडमाने यांनी दिली. सदर रेलसेवा २६ ऑगस्ट ते ९ सष्टेंबरपर्यंत राहणार आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये या एक्स्प्रेसच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी तीन ट्रिप्स होणार आहेत.

हेही वाचाः भाजपमध्ये अल्पसंख्याक मुख्यमंत्रीही शक्य

वास्कोहून गुरुवारी दुपारी 2.30 वा. एक्सप्रेस निघाली; शुक्रवारी सकाळी 8.30 वा. चेन्नईत दाखल

वास्को रेल्वे स्थानकवरून गुरुवारी दुपारी अडीच वाजता सुटलेली एक्स्प्रेस शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता चेन्नई स्थानकावर पोहचणार आहे. सदर एक्स्प्रेस  मडगाव, सावर्डे, कुडचडे, कुळे, कॅस्टलरॉक, लोंढा, धारवाड, हुबळ्ळी, हावेरी, रानीबेन्नुर, हरिहर, दावणगिरी, बिरूर, अरसिकेर, टिपटूर, टूमकुरू, यशवंपुर, बानसवाडी, कृष्णराजपूरम्, बांगरपेठ, जोलारपेट्टीई, काटपडी, आराक्कोनम् आणि पेरांबूर या स्थानकावर थांबेल.

एमजीआर चेन्नई सेट्रलहून शुक्रवारी दुपारी तीन वाजता वास्कोकडे एक्स्प्रेस निघेल. ती दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता वास्कोला पोहोचेल.

हा व्हिडिओ पहाः Taxi Issue | फोंड्यातील टॅक्सी व्यावसायिकांना ताम्हणकरांचा पाठिंबा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!