गोव्यात मूल्यवर्धन – इ. सी. इ. प्रशिक्षण उत्साहात !

स. प्रा. वि. शिरगाव - डिचोलीच्या चिमुकल्यांनीही शिक्षकांना केले मार्गदर्शन

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पर्वरी आणि गोवा शिक्षण विकास महामंडळ, पर्वरी यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येत आहे. त्याचाच पुढील स्तर म्हणजे एनहान्सिंग सिविक एंगेजमेंट (इ. सी. इ.) हा अभ्यासक्रम इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या मुलांना २०२२- २३ या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येत आहेत.
हेही वाचाःवन मावळींगे कुड​चिरे पंचायतीचे ८३ वर्षीय पंच भागो वरक यांचे निधन…

राज्यभर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रशिक्षण सुरू

यामध्ये गोव्यातील सर्व सरकारी तसेच सरकारी अनुदानित उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘कचरा व्यवस्थापन’, ‘वैयक्तीक स्वच्छता’ हा अभ्यासक्रम विज्ञान आणि समाजशास्त्र विषायांमधून तर ‘रस्ता सुरक्षा आणि जागरूकता’ हे शारीरीक शिक्षण या विषयांतर्गत शिकविण्यात येणार आहेत. वरील सर्व अभ्यासक्रमांचा त्या – त्या वर्गांतील पाठ्यपुस्तकांत समावेशही करण्यात आलेला असून हे अभ्यासक्रम कसे शिकवावेत याचे सद्यस्थितीत राज्यभर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रशिक्षण देणे सुरू आहे.
हेही वाचाःमुख्यमंत्री देवदर्शनासाठी ६० वर्षे वयोगटाची अट मागे, वाचा सविस्तर…

अभिनव अभ्यासक्रम राबविणारे गोवा पहिलेच राज्य

त्यासाठी सर्व तालुक्यातील उपक्रमशील माध्यमिक शिक्षक – शिक्षिका यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पर्वरी येथे प्रशिक्षण देऊन त्या मास्टर रिसोर्स पर्सन शिक्षकांद्वारे सर्व माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. देशातील शैक्षणिक क्षेत्रात असा अभिनव अभ्यासक्रम राबविणारे गोवा हे पहिलेच राज्य बनले आहे.
हेही वाचाःGoa Crime news: मच्छीमार ट्रॉलरवरील भांडणात खलाशाचा खून‍…

शिक्षण तज्ञ, वरिष्ठ अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी अभ्यासक्रमाची रचना, नियोजन

दिवंगत माजी मुख्यमंत्री तथा देशाचे संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्यातर्फे घोषणा झाल्यानंतर तत्कालीन शिक्षण तज्ञ, विविध क्षेत्रांतील वरिष्ठ अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी या अभ्यासक्रमाची रचना, नियोजन करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन तसेच सद्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, एस. सी. इ. आर. टी. संचालक, नागराज होंनेकेरी,
जि.इ.डी.सी. अध्यक्ष, श्रीपाद कांता पाटणेकर, एस. एम. एफ. अध्यक्ष शांतीलाल मुथा, कर्नल पूनीत नैथाणी, संताजी रोडे आदींनी या शैक्षणिक उपक्रमासाठी सर्व स्तरांवरून मूल्यमापन करून हा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.
हेही वाचाःभारतीय प्रेक्षकांवर चालली ‘कांतारा’ची मोहिनी!

राज्यातील सरकारी तसेच अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१६ – १७ पासून या अभ्यासक्रमातील उपक्रमांची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात आली तसे सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले. या कार्यक्रमाचे वेळोवेळी शिक्षण संचालक, अधिकारी, संस्था यांच्यातर्फे शाळांना भेटी देऊन पर्यवेक्षण, संशोधन, यशस्वीता तपासण्यात आली. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम संपूर्ण गोव्यातील शाळांमधून इयत्ता १ली ते ४थी साठी मूल्यवर्धन मधून तर ५वी च्या वरील इयत्तांसाठी विज्ञान, समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण या विषयांतर्गत शिकविण्यात येणार आहे.
हेही वाचाःदहा पोलीस अधीक्षकांना पदभार…

मूल्यवर्धन आणि इ.सी.इ विषयांचे शिक्षकांना प्रशिक्षण

सर्वप्रथम २४ शाळांची निवड करण्यात आली त्यामध्ये डिचोली तालुक्यातील सरकारी प्राथमिक शाळा शिरगांव या शाळेची निवड करण्यात आली होती. २०१६ -१७ मध्ये पर्वरी येथे मूल्यवर्धन आणि इ.सी.इ (Enhancing civic Engagement) या विषयांचे शिक्षकांना प्रशिक्षण झाले. त्यानंतर या शाळेतील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्याने वेगवेगळे अभिनव आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यश प्राप्त केले त्यांनाही या प्रशिक्षणाला निमंत्रित करण्यात आले होते.
हेही वाचाःकेवायसी अपडेटच्या नावाखाली महिलेला १०.५३ लाखांचा गंडा

बाटलीत प्लास्टिक भरण्याचा अभिनव उपक्रम सुरू

दरम्यान, या प्रशिक्षणादरम्यान प्रायोगिक तत्वावर यशस्वीपणे इ.सी.इ. राबविणारी शाळा, स.प्रा.वि. शिरगाव या शाळेतील विद्यार्थी, पालक शिक्षिका उपस्थित होते. शाळेतील चिमुकल्यांनी माध्यमिक शिक्षकांना “कचरा व्यवस्थापन ” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी कोण कोणते उपक्रम केले त्याची सविस्तर माहिती दिली. लॉकडाऊन मध्ये घरी असताना शिक्षकांनी मूल्यवर्धनचे तसेच स्वतः बनविलेले मार्गदर्शक व्हिडिओद्वारे पाठवलेल्या माहितीच्या आधारे आपण बाटलीत प्लास्टिक भरण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला याचे अनुभव कथन विद्यार्थिनी दूर्वा नारायण कवठणकर आणि कुमार पुनीश शेखर नाईक यांनी सांगितले.
हेही वाचाः‘गोवा टॅक्सी’ अॅपवर सरकार ठाम; मालक खवळले ! ‍

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!