आजपासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू; वाचा कधी कुणाचं लसीकरण

उत्तर गोवा जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची यादी जाहीर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता कोरोना लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. राज्यात सध्या 45 वयोगटावरील व्यक्तींचं लसीकरण सुरू आहे. आजपासून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरू होत आहे. 3 जून पासून सुरू होणाऱ्या या लसीकरण मोहिमेत सर्वप्रथम 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या पालकांना, को-मॉर्बिड आजार असलेल्यांना, दिव्यांग व्यक्तींना तसंच वाहतूक खात्याने सुचवल्याप्रमाणे रिक्षा चालक, नोंदणीकृत मोटारसायकल पायलट, टॅक्सी ड्रायव्हर आणि दर्यावर्दीच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून उत्तर गोवा जिल्ह्यात प्राधान्य श्रेणीसाठी लसीकरण केंद्राचा तपशील जारी करण्यात आलाय.

हेही वाचाः सरकारने ‘त्या’ दोन लाखांचा हिशोब द्यावा

लसीकरण केंद्राचं नाव; नोडल ऑफिसरचा संपर्क

अनु. क्र.साइटचं नावसंबंधित रुग्णालय/ आरोग्य केंद्र  नोडल ऑफिसरचा संपर्क क्र.
1सरकारी प्राथमिक शाळा, मुरमुसे, तुयेसामाजिक आरोग्य केंद्र पेडणे9822488846
2सामाजिक आरोग्य केंद्र पेडणे  
3नवीन लेक्चर हॉल (डीन ऑफिसच्या शेजारी), गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, बांबोळीजीएमसी, बांबोळी9823928743
4बीएसएनएल कॉटर्सजवळील प्राथमिक आरोग्य केंद्र चिंबल, बांबोळीप्राथमिक आरोग्य केंद्र चिंबल9011025039
5कला, विज्ञान आणि वाणिज्य सभागृह शासकीय महाविद्यालय, साखळीसामाजिक आरोग्य केंद्र, साखळी9421157251
6ग्रामपंचायत सभागृह, अस्नोडाप्राथमिक आरोग्य केंद्र, कोलवाळे8411031593
7डॉन बॉस्को हायस्कूल, पणजीअर्बन हेल्थ सेंटर पणजी8308180368
8ग्रामिण आरोग्य केंद्र, मंडुरग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र8806386075
9ग्रामपंचायत सभागृह, साल्वादोर दे मुंद, पर्वरीप्राथमिक आरोग्य केंद्र पर्वरी8669870034
10संजय स्कूल, पेन्हा दे फ्रान्का, पर्वरी  
11दयानंद हायस्कूल, चोडणप्राथमिक आरोग्य केंद्र मये9011025027
12प्राथमिक आरोग्य केंद्र, खोर्लीप्राथमिक आरोग्य केंद्र, खोर्ली9923247284
13केटीसी बसस्टॅंड (हॉल), वाळपईसामाजिक आरोग्य केंद्र, वाळपई9890860097
14म्युनिसिपल हॉल, वाळपई  
15नारायण झाट्ये महाविद्यालयाचा बहुउद्देशीय सभागृह, सर्वण डिचोलीसामाजिक आरोग्य केंद्र, डिचोली9921909800
16सेंट. फ्रान्सिस झेवियर हायस्कूल, शिवोलीप्राथमिक आरोग्य केंद्र शिवोली9823448567
17सेंट. थॉमस उच्च माध्यमिक विद्यालय, हळदोणप्राथमिक आरोग्य केंद्र, हळदोण9545517435
18प्राथमिक आरोग्य केंद्र, कासारवर्णेप्राथमिक आरोग्य केंद्र, कासारवर्णे9588667974
19सारस्वत विद्यालय हायस्कूल, म्हापसाअर्बन हेल्थ सेंटर म्हापसा8805618189
20जीपीएस, कुटोळा, साळगावप्राथमिक आरोग्य केंद्र कांदोळी9325371246
21सेंट जोसेफ हायस्कूल, कळंगुट  

हेही वाचाः शिवोलीतील तरंगत्या जेटीचे चोपडेत स्थलांतर करणार

कधी कुणाचं लसीकरण?

3 जून पासून सुरू होणाऱ्या 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोहिमेत 3 जून ते 10 जून या काळात दिव्यांग, स्तनदा माता, 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे पालक यांचं लसीकरण होणार आहे. लसीकरणासाठी येताना दिव्यांगांनी समाजकल्याण प्रमाणपत्र किंवा यूडीआयडी कार्ड आणि आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड सोबत ठेवणं आवश्यक आहे. स्तनदा माता तसंच 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या पालकांनी लसीकरणासाठी येताना मुलाचा जन्मदाखला आणि आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड सोबत ठेवणं आवश्यक आहे.

हेही वाचाः मुरगाव तालुक्यातील गरजूंसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू

7 जून ते 15 जून या काळात 18 ते 44 वयोगटातील को-मॉर्बिड आजार जसे की मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर, रिनेल फेलिअर, डाऊन सिंड्रोम/सेरेब्रल पाल्सी इ. आजर असलेल्या व्यक्ती; रिक्षा, टॅक्सी आणि मोटरसायकल पायलट तसंच दर्यावर्दींचं लसीकरण होणार आहे. को-मॉर्बिडिटी आजार असलेल्यांना संबंधित परिषदांचा नोंदणी क्रमांक असलेल्या त्यांच्या पत्रप्रमुखावर नोंदणीकृत वैद्यकीय अभ्यासकांकडून प्रमाणपत्र तसंच आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड सोबत ठेवणं अपेक्षित आहे. टॅक्सी, मोटरसायकल आणि रिक्षा चालकांना आरटीओ वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि आरटीओ बॅचसह ड्रायव्हिंग लायसन्स आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड सोबत ठेवणं अपेक्षित आहे, तर दर्यावर्दींना बंदर कप्तान किंवा एसआयडी प्रमाणपत्र (सीफेरर आयडेंटीटी डॉक्युमेंट) किंवा सीडीसी (कंटिन्यू डिश्चार्ज सर्टिफिकेट) किंवा तत्सम डॉक्युमेंट तसंच आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड सोबत ठेवणं अपेक्षित आहे. ही कागदपत्रे लसीकरण केंद्रावर सादर केल्यानंतरच या व्यक्तींना लसीकरणासाठी पहिलं प्राधान्य देण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!