VACCINATION | 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी येत्या रविवारपासून ‘टीका उत्सव-3’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा; 30 जुलैपर्यंत राज्यातील 100 टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यातून कोविड महामारीला लवकरात लवकर हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा नव्या उमेदीने सज्ज झालीये. कोविडची तिसरी लाट कधीही राज्यात प्रवेश करू शकते. ती राज्यात प्रवेश करण्यापूर्वी लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्याचं लक्ष्य राज्य सरकारने समोर ठेवलंय.

हेही वाचाः CORONA UPDATE | दिलासादायक! राज्यातील कोविड आकडेवारी आटोक्यात

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी लाईव्ह येत गोंयकारांशी संवाद साधताना ‘टीका उत्सव – 3’ची घोषणा केलीये. येत्या रविवारपासून राज्यातील 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी ‘टीका उत्सव – 3’ सुरू होणार असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज संध्याकाळी गोंयकारांशी लाईव्ह संवाद साधताना सांगितलंय.

हेही वाचाः आंतरमंत्रालयीन पथकाची बैठक; तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीचा घेतला आढावा

30 जुलै 2021 पर्यंत 18 – 44 वयोगटातील व्यक्तींना मिळणार पहिला डोस

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या जाहीर भाषणात सांगितलं की, 18 ते 44 वयोगटातील लोकसंख्येला लस देण्यासाठी सर्व पंचायती आणि नगरपालिकांमध्ये 87 कॅम्प्स सुरू केले जातील. राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्वांचं लसीकरण 30 जुलै 2021 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य राज्य सरकारने समोर ठेवलंय, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचाः १८ जून रोजी राज्यात गोवा क्रांती दिवस समारंभ

वेळापत्रक लवकरच करणार जाहीर

प्रत्येक पंचायत तसंच नगरपालिकांचं वेळापत्रक राज्य सरकार लवकरच जाहीर करणार आहे. त्यामुळे लोकांनी लसीकरण  केंद्रात जाण्याची घाई करण्याची गरज नाही, असं मुख्यमंत्री आपल्या संबोधनात म्हणालेत. लसीकरणासाठी लाभार्थी ‘वॉक-इन’ करू शकतात. तसंच प्रत्येक केंद्रात (कॅम्प) दररोज 250 लसी दिल्या जातील, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!