‘या’ व्यक्तींच्या लसीकरणाला प्राधान्य; अधिकृत परिपत्रक जारी

सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी जारी केलं परिपत्रक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर तसंच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा विचार करता राज्य सरकारने लसीकरणाचा वेग वाढवलाय. सध्या राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत राज्य सरकराकडून विशिष्ट वर्गातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आलंय. त्याच संदर्भातलं परिपत्रक राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलंय.

‘या’ व्यक्तींच्या लसीकरणाला प्राधान्य

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार स्तनदा माता, दर्यावर्दी, ऑटो रिक्षा चालक, टॅक्सी चालक, मोटर सायकल पायलट्स, 2 वर्षांखालील मुलांचे पालक, 18 ते 44 वयोगटतील को-मॉर्बिड आजार असलेल्या व्यक्ती, 4 जून पासून 5 वर्षांखालील मुले असलेले पालक, 5 जूनपासून 10 वर्षांखालील मुले असलेले पालक तसंच 6 जून पासून 15 वर्षांखालील मुले असलेले पालक यांच्या लसीकरणाला सरकारकडून प्राधान्य देण्यात आलंय. त्याचप्रमाणे ज्यांना शिक्षण, रोजगार तसंच खेळांमध्ये भाग घेण्यासीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करायचा आहे, अशा 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण प्राधान्याने करणार असल्याचं सरकारने म्हटलंय.

हेही वाचाः खासगी रुग्णालयांवरील अनावश्यक टीका ही निंदनीय

केंद्राच्या नियमावलीनुसार लसीकरण

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेलं परिपत्रक 8 जून 2021 पासून लागू आहे. परिपत्रकात नमूद करण्यात आलेल्या व्यक्तींचं लसीकरण हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या कोविड नियमावलीनुसार होणार असल्याचं परिपत्रकातून सांगण्यात आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!