शैक्षणिक संस्थांतील कर्मचार्‍यांना लसीकरण अनिवार्य

अपेक्षित तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन आदेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकणार असल्याचं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी करताना राज्यातील 18 वर्षांखालील मुलांशी नियमित संपर्कात येणार्‍या शैक्षणिक संस्थांच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता लसीकरण घेणं बंधनकारक केलं जाईल, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलं.

हेही वाचाः ‘आप’ कार्यकर्त्यांनी केक देऊन साजरी केली पक्षांतराची वर्षंपूर्ती

लस घेत नाही तोपर्यंत कामावर येण्याची परवानगी नाही

जे कर्मचारी या आदेशाचे पालन करत नाहीत, त्यांना मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लस घेत नाही तोपर्यंत कामावर येण्याची परवानगी देण्यात येणार नाही. ‘टास्क फोर्स’च्या बैठकीच्या अध्यक्षपदावरून मुख्यमंत्री सावंत यांनी संभाव्य तिसर्‍या लाटेच्या तयारीचा आढावा घेतना ही गोष्ट स्पष्ट केली. शासनाने तज्ज्ञ समितीच्या विविध सूचना मान्य केल्या आहेत, ज्यात 18 वर्षांखालील मुलांशी नियमित संपर्कात येणार्‍या शैक्षणिक संस्थांच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता लस घेणं बंधनकारक केलं जाणार आहे.

हेही वाचाः जीएमसीच्या बाहेर विक्रेत्यांनी पुन्हा थाटले व्यवसाय

गोवा सिव्हिल सर्व्हिसेसच्या सात कनिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्त

गोवा सरकारने ‘गोवा लोकसेवा आयोगा’च्या शिफारशीनुसार गोवा सिव्हिल सर्व्हिसेस (ग्रुप ‘ए गॅझेटेड’) च्या सात कनिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्त केली. यात शुभम मोहन नाईक, गणेश कृष्णकुमार बर्वे, योगिराज प्रकाश गोसावी, अश्विनी अभय गावस देसाई, गिरीश गोपाल सावंत, सीताराम गुरुदास सावळ (ओबीसी), मनोहर लवू कारेकर (ओबीसी) यांची नेमणूक केली आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | ACCIDENT | वाळपई हेल्थ सेंटरसमोर इनोव्हाची गुरांना धडक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!