डिचोलीत 3 जूनपासून 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरण

डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोलीः कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग आलाय. डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे गुरुवार 3 जूनपासून 18 ते 45 वयोगटासाठीचं लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी दिली.

हेही वाचाः सिंधुदुर्गात ‘म्हाडा’ उभारणार 50 बेडचं अद्ययावत कोविड रुग्णालय

डिचोलीत कुठे होणार लसीकरण?

डिचोलीतील श्री शांतादुर्गा विद्यालय तसंच सर्वण येथील झाट्ये  महाविद्यालयाच्या मल्टी पर्पज हॉलमध्ये  सकाळी  9.30 ते संध्याकाळी 5 या वेळेत 18 ते 45 वयोगातील व्यक्तींसाठी लसीकरण होणार आहे. दर दिवशी 200 जणांचं लसीकरण करण्याचा उद्दिष्ट्य डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राने समोर ठेवलं असल्याचं डॉ. साळकर यांनी सांगितलं.

हेही वाचाः अखेर परदेशी लसींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

या व्यक्तींना लसीकरणासाठी प्राधान्य

3 जून पासून सुरू होणाऱ्या या लसीकरण मोहिमेत सर्वप्रथम 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या पालकांना, को-मॉर्बिड आजार असलेल्यांना, दिव्यांग व्यक्तींना तसंच वाहतूक खात्याने सुचवल्याप्रमाणे रिक्षा चालक, नोंदणीकृत मोटारसायकल पायलट, टॅक्सी ड्रायव्हर आणि दर्यावर्दीच्या लसीकरणाला प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार या लसीकरणात या व्यक्तींना पहिलं प्राधान्य देण्यात येणार आहे.

हेही वाचाः गोवा-सिंधुदुर्गात कामासाठी येणा-जाणाऱ्यांना टेस्ट बंधनकारकच !

कागदपत्र सादर करण्याचं आवाहन

या लसीकरण मोहिमेत स्तनदा मातांचं लसीकरणही होणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी येताना 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या पालकांनी तसंच स्तनदा मातांनी त्यांच्या मुलांचा जन्मदाखला, दिव्यांग व्यक्तींना समाजकल्याण प्रमाणपत्र, दर्यावर्दींना बंदरांच्या कप्तानचं प्रमाणपत्र, टॅक्सी आणि रिक्षा चालकांना आरटीओ वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि आरटीओ बॅचसह ड्रायव्हिंग लायसन्स लसीकरण केंद्रावर सादर करणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे को-मॉर्बिडिटी म्हणजे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, किडनी विकार, कॅन्सर यासारखे आजर असलेल्यांना संबंधित परिषदांचा नोंदणी क्रमांक असलेल्या त्यांच्या पत्रप्रमुखावर नोंदणीकृत वैद्यकीय अभ्यासकांकडून प्रमाणपत्र घ्यावं लागेल. किंवा आयुष डॉक्टर प्रमाणपत्रादेखील वैध आहे. ही कागदपत्रे लसीकरण केंद्रावर सादर केल्यानंतरच या व्यक्तींना लसीकरणासाठी पहिलं प्राधान्य देण्यात येणार असल्याचं डॉ. मेधा साळकर यांनी सांगितलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!