उत्पल पर्रीकर, रमेश तवडकरांची राष्ट्रीय पातळीवर दखल

केंद्रिय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर आणि माजी मंत्री रमेश तवडकर यांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आलीये. केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंडळाच्या संचालकपदी उत्पल पर्रीकरांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर माजी मंत्री रमेश तवडकर यांची राष्ट्रीय अनुसूचित जमात (एसट ) मोर्चाच्या सचिवपदी नेमणूक करून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. उत्पल पर्रीकर यांची सरकारी अधिकारिणीवर नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

केंद्रीय नितीन गडकरी या मंडळाचे अध्यक्ष

केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली ४६ सदस्यीय समितीत राज्यमंत्री प्रतापचंद्र, षडग्नी, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, महाराष्ट्र कर्नाटक, आसाम या राज्यांतील संबंधित खात्यांचे मंत्री तसंच इतर राज्यांतील नेत्यांचाही समावेश आहे.

भाजप कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर उत्पल पर्रीकर राजकारणात काही प्रमाणात सक्रिय झाले होते. पणजी पोटनिवडणुकीत भाजप उत्पल परीकरांना उमेदवारी देऊन त्यांना प्रत्यक्ष राजकारणात आणेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना होता. पण भाजपने पुन्हा सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनाच उमेदवारी दिली होती. त्यानंतर भाजपचे निवडक उपक्रम वगळता उत्पल फारसे राजकारणात सक्रिय असल्याचे दिसून आलेले नव्हते . केंद्र सरकारने त्यांची केंद्रीय मंडळावर नेमणूक केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त करण्यात येतंय.

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीतील आलेले तवडकर राज्यातील एकमेव

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झालेले तवडकर राज्यातील एकमेव नेते ठरलेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसंच प्रदेश भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी या निवडीबद्दल तवडकरांचं अभिनंदन केलंय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तवडकरांना ट्विट करून शुभेच्छा दिल्यात.


भाजपच्या प्रदेश कार्यकारीणीचे सदस्य

उत्पल हे भाजपच्या प्रदेश कार्यकारीणीचे सदस्यही आहेत. कोविड काळात पणजीवासियांना मदत करण्यात ते सक्रीय होते. मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर पणजी विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीवेळी त्यांना भाजपची उमेदवारी मिळेल असं मानलं जात होतं. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतरही पणजीतील जनसंपर्क त्यांनी कायम ठेवला आहे. आता त्यांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन

केंद्रिय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल उत्पल पर्रीकरांचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केलंय. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून उत्पल पर्रीकर शुभेच्छा दिल्यात. उत्पल पर्रीकर यांची केंद्रिय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा, असं मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!