कमी पाणी वापरा; आणखी फायदा मिळवा!

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक प्रभु पाऊस्कर यांचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: १६ हजार लीटरपर्यंत पाणी वापरणाऱ्या कुटुंबांवर सार्वजनिक बांधकाम खातं नियंत्रण ठेवेल. जी कुटुंबे सलग दोन-तीन महिने प्रत्येक महिन्याला १६ हजार लीटरपेक्षा कमी पाणी वापरतील त्यांची प्रलंबित बिलं माफ करण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर ठेवणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक प्रभु पाऊस्कर यांनी दिली.

हेही वाचाः ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन

१९ लाख लोकसंख्येला प्रति महिना ६०० एमएलडी पाणी लागतं

गोव्याची लोकसंख्या सध्या सुमारे १९ लाख इतकी आहे. या लोकसंख्येसाठी प्रत्येक महिन्याला ६०० एमएलडी पाणी लागतं. पण सध्या ५३० एमएलडी पाणी देणं शक्य होतं. उर्वरित ७० एमएलडी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरकारने काणकोण, चांदेल, पर्वरी, तुये, गुळेली येथील नियोजित पाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या ५२ कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून, काही ठिकाणची कामेही सुरू केली आहेत.

फेब्रुवारी 2022 पर्यंत पिण्याच्या पाण्याची समस्या संपेल

फेब्रुवारी २०२२ पर्यंत सर्वच ठिकाणचे प्रकल्प सुरू होऊन राज्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपेल, असा दावाही मंत्री पाऊस्कर यांनी केला.

हा व्हिडिओ पहाः TRAINING FOR WOMAN | ओझरी गावातील महिलांना आधुनिक व्यवसाय प्रशिक्षण

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!