इंटरनेट सेवेचा शिक्षणासाठी वापर करा

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी
पेडणेः कोरोना काळात विद्यालयीन शिक्षणावर परिणाम झाला आहे. शाळा, कॉलेज बंद आहेत. या काळात ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण चालू आहे. गावात इंटरनेट सेवा विस्कळीत असल्यानं विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ही इंटरनेट सेवा सुरु केली आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ करून घ्यावा, असं आवाहन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी केलं. तुये येथे मोफत वायफाय इंटरनेट सेवा कार्यरत केल्यानंतर ते बोलत होते.
हेही वाचाः Tokyo Olympics 2021 : फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताचं मेडल पक्कं!
4 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचं आयोजन
तुये येथील पंचायत सभागृहात ४ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमाला सरपंच सुहास नाईक, माजी सरपंच प्राजक्ता नाईक, माजी सरपंच प्रदीप परब, जयराम नाईक, रोटरी क्लबचे सागर गोवेकर, पंच कविता तुयेकर, गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत आदी उपस्थित होते.
हेही वाचाः आमदार सोपटेंनी नव्हे, विजय सरदेसाईंनी गोवा विकायला काढला होता
काहीजणांनी काम रोखल्यानं सेवेला विलंब
गावागावात इंटरनेट सेवेचं जाळं विणण्यासाठी कंपनीमार्फत केबल टाकण्याचं काम सुरू होतं. काहीजणांनी मधेच काम रोखल्यानं या सेवेला विलंभ झाला आहे. काम रोखणाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करायला हवा होता, असं आमदार सोपटे बोलताना म्हणाले.
हेही वाचाः BREAKING | राज्यातील प्रवासी टॅक्सी दरांत वाढ
आमदार सोपटेंचे आभार
गावात ही सेवा सुरू करण्याविषयी आम्ही आमदार सोपटेंकडे चर्चा केली होती. त्यानंतर आमदार सोपटेंनी लगेच ही सेवा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. ही सेवा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सोपटेंचे आभार, असं सरपंच सुहास नाईक बोलताना म्हणाले.
हेही वाचाः कणकवलीनजीक 4,57,000 ची गोवा दारू पकडली ; एकास अटक
अत्यावश्यक सेवेच्या माध्यमातून राजकारण नको
अत्यावश्यक सेवेच्या माध्यमातून विरोधकांनी राजकारण करू नये. गावात सोयी-सुविधा पुरवण्याकडे आमदार सोपटे लक्ष देत आहेत, असं गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत यांनी बोलताना सांगितलं.