विलास मेथर हत्याप्रकरण – शैलेश शेट्टीला 5 दिवसांची पोलिस कोठडी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पर्वरी : विलास मेथर हत्याप्रकरणी सातवी अटक करण्यात आलेल्या शैलेश शेट्टीला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी रात्री त्याला अटक करण्यात आली होती. पर्वरी पोलिसांनी ही अटक केली होती. विलास मेथर हत्याप्रकरणाचा कट ज्यावेळी रचला गेला, त्यावेळी तिथे शेट्टी उपस्थित होते, असा आरोप आहे.

काय आहे विलास मेथर हत्यप्रकरण?

बुधवार 15 तारखेला सामाजिक कार्यकर्ते विलास मेथर यांच्यावर पेट्रोल मिश्रित द्रव्य टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोव्याच्या इतिहासात आतापर्यंतची दिवसाढवळ्या अशाप्रकारे हल्ला करुन जिवंत माणसाला जाळण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडलाय.

विलास मेथर बिल्डर अल्ताफ हेरगिट्टी यांच्याविरोधात लढा देत असल्याची माहिती मिळतेय. फ्लॅटच्या कागदपत्रांवरुन त्यांचा बिल्डरशी वाद झाला होता. विलास मेथर यांची गाडी वाटेत अडवून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या धक्कादायक घटनेनंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत याप्रकरणी एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून पोलिस या हत्याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

हेही वाचा –

दसऱ्याआधीच दिवाळी! केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, राज्यसरकारी कर्मचाऱ्यांचं काय?

1ली ते 8वीच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!