सांतीनेझ गोळीबारप्रकरणी पुण्याहून आणखीन दोघांना अटक

मुख्य संशयिताचा जामीन फेटाळला, तर दोघांना सशर्त जामीन

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : ३० तारखेला पणजी पिटर- भाट इथं झालेल्या गोळीबाळप्रकरणी आता पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. थेट पुण्यातहून आणखी दोघांना अटक केल्यामुळे याप्रकरणी आता काय अधिक कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.

पुण्याहून दोघा तरुणांना अटक

पिटर भाट–सांतिनेझ येथे शनिवार ३० मे रोजी मध्यरात्री मारहाण करून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी पुणाहून तोफिक शेख (२५) आणि कुणाल गायकवाड (२२) दोघांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य संशयिताने दाखल केलेला जामीन पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने फेटाळून लावला. तर इतर दोघांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणी पिटर भाट येथील दर्शन राजपूत यांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार, शनिवार २९ रोजी मध्यरात्री संशयित गौतम अस्नोडकर यांनी त्याच्या दोन साथीदाराने शुल्लक कारणावरून मारहाण केल्याचे म्हटले आहे. तसेच संशयित गौतम याने हवेत गोळीबार करून पळ काढल्याचे तक्रारीतही म्हटले होते. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी संशयित गौतम अस्नोडकर(२१- मेरशी), आकाश मुथवाडी(२० – कामराभाट) आणि राहूल जाधव (३०- कोल्हापूर) याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३, ५०४, ५०६, ४२७ आणि शस्त्र कायद्याचे कलम ३ व २७ नुसार गुन्हा दाखल करून दुसऱया दिवशी अटक केली होती.

अट केलेल्यांना पोलीस कोठडी

अटक केलेल्या संशयितांना पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान संशयितांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यातील न्यायालयाने मुख्य संशयित गौतम अस्नोडकर याच्या जामीन अर्ज फेटाळून लावला. तर इतर दोघांना १० हजार रुपये आणि पाच दिवस पोलिस स्थानकात हजेरीच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी वकील अनुप कुडतरकर यांनी बाजू मांडली आहे.

दरम्यान या प्रकरणात मुख्य संशयिताला पिस्तुलाची पुरवठा केल्यानं पणजी पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक बाबलो परब, पोलीस कॅन्स्टेबल आदित्य म्हादोळकर, अजय मुल्ला, रामा घाडी आणि शालक कळंगुटकर या पथाकाने शुक्रवारी रात्री पुण्याहून तोफिक शेख आणि कुणाल गायकवाड या दोघांना अटक करून गोव्यात आणलंय. अटक करण्यात आलेल्या संशयिताना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!