दुर्दैवी! गॅस सिलिंडर आणि दुचाकींच्या विचित्र अपघातात तरुणाचा मृत्यू

उपचारासाठी नेत असताना १९ वर्षीय तरुणाचा दुर्देवी अंत

देविदास गावकर | प्रतिनिधी

वाळपई : रेडेघाटीत झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय. १९ वर्षीय दुचाकीस्वार दत्तप्रसाद पुंडलिक गांवकर हा या अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेतानाच वाटेतच मृत्यूनं त्याला गाठलं. १९ वर्षीय तरुणाच्या मृत्यूमुळे गांवकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. जीएमसीमध्ये जखमी दत्तप्रसाद याला उपचारासाठी नेलं जात होतं. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

दत्तप्रसाद हा एक्टीव्हा वरुन जात होता. या अपघातात त्याच्या तोंडाला जबर मार बसून तो गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

हेही वाचा – टिप्पर आणि स्कूटीचा भीषण अपघात, वेर्णा नागोवा ठरतंय अपघाताचं केंद्र

दरम्यान, या अपघातात मोठा अनर्थ टळलाय. गॅस सिलिंडरने भरलेली बोलेरो या अपघातात उलटली. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र थोडक्यात अनर्थ टळलाय. या अपघातात गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या बोलेरोचंही मोठं नुकसान झालंय. तर दुचाकींचंही मोठं नुकसान झालं असून तिघे जण जखमी झालेत. बोलेरो, एक्टीव्हा आणि स्प्लेंडरच्या या विचित्र अपघातात तिघांना किरकोळ मार लागल्याची माहिती मिळतेय. कुणाच्या चुकीमुळे नेमका हा अपघात घडला, याची माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा – भीषण! ट्रकच्या धडकेत आईचा दुर्दैवी मृत्यू, बालिका जखमी

या अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. अपघातानानंतर बघ्यांची गर्दीही या ठिकाणी जमली होती. साधारण दहा साडेदहाच्या दरम्यान हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते. एकूणच राज्यातील अपघातांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. दक्षिण गोव्यासोबत आता उत्तर गोव्यातही वाढत्या रस्ते अपघातांनी चिंता वाढवली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

हेही वाचा – भीषण! फूटपाथवर झोपलेल्या ‘त्यांना’ ट्रकने चिरडलं

हेही वाचा – भीषण! शिवमोगामध्ये स्फोट; 8 जणांचा मृत्यू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!