UPDATE | नारायण नाईक हल्लाप्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रांचकडे

हल्लाप्रकरणातील मुख्य संशियाताला 3 दिवसांची पोलीस कोठडी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सांकवाळ येथील आरटीआय अ‍ॅक्टिव्हिस्ट नारायण दत्ता नाईक हल्लाप्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलाय. तसंच हल्ल्याची सुपारी देणारा मुख्य संशयित सूत्रधार रामगोपाल यादव उर्फ करिया (वय ४०, रा. झुआरीनगर) याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. शनिवारी झालेल्या नाईक यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी काल रामगोमाल यादव याला अटक केली होती. या हल्ल्याची सुपारी देणारा मुख्य संशयित सूत्रधार रामगोपाल यादव उर्फ करियाला आज वास्को येथील जेएमएफसी कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टानं या हल्ल्याप्रकरणी त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी तपास करत असलेले वास्को रेल्वे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजन निगळे यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान या प्रकरणी बुरखादारी दोन हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : Video | Accident | Chorla Ghat | चोर्ला घाटामध्ये तीन गाड्यांचा विचित्र अपघात

काय आहे प्रकरण?

सामाजिकी कार्यकर्ते नारायण दत्ता नाईक यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये त्यांच्यावर लोखंडी रॉडने अज्ञातांनी येऊन हल्ला केला. यामध्ये नारायण दत्ता नाईक हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी जीएमसीत आणण्यात आलं होतं. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता एकाला ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान, आता अधिक चौकशीतून एकाला अटक करण्यात आली होती.

कोण आहेत नारायण दत्ता नाईक

नारायण नाईक हे सामाजिक कार्यकर्ते असून ते आरटीआय एक्टिव्हिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी पंचायत क्षेत्रातील कोमुनिदाद जमिनीवर बड्या बिल्डरांनी केलेला कब्जा, बेकायदा बांधकामं आदी अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी आरटीआयच्या माध्यमातून भानगडी उघडकीस आणल्या होत्या. या सगळ्या भानगडीत अप्रत्यक्षपणे त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले. त्यातूनच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

हेही वाचाः Video | Update | Activist Attacked | नारायण नाईकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एकाला बेड्या

हा व्हिडिओ पहाः Video | Breaking | Attack on Activist | सामाजिक कार्यकर्ते नारायण दत्ता नाईकांवर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!