Crime | अमर नाईकवर ज्या शस्त्रातून गोळी झाडली, ते पिस्तुल सापडलं!

पोलिसांच्या तपासाला मोठं यश

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

वास्को : अमर नाईक हत्याप्रकरणी पोलिसांच्या हाती आता महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. त्यामुळे या हत्येप्रकरणी मोठा खुलासा आणि पुरावे आता पोलिसांना मिळाल्याचा विश्वास व्यक्त केला जातो आहे. दोन दिवसांपूर्वी दक्षिण गोव्यात अमर नाईक यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ज्या शस्त्रानं अमर नाईक यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता, ते पिस्तुल पोलिसांच्या हाती कधी लागतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर हे पिस्तुल पोलिसांच्या हाती लागलंय. पोलीसांच्या तपासातली ही मोठी उपलब्धी मानली जाते आहे.

काय काय सापडलं?

वास्कोतील अमर नाईक गोळीबारात वापरलेल्या देशी बनावटीच्या दोन पिस्तुल व काडतुसे पोलिसांनी शनिवारी जप्त केली आहेत. याशिवाय आणखी एका आरोपीची ओळख पटली आहे. अमर नाईक खून प्रकरणातील तिसरा संशयित आरोपीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. रवी शंकर यादव असं अटक करण्यात आलेल्या तिसऱ्या संशयिताचं नाव असून त्याचं वय ३० वर्ष आहे. तिसरा संशयित आरोपी आझमगड, उत्तर प्रदेशचा राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

संशयित शैलेश गुप्तानेच अमरवर गोळ्या झाडल्याचे उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. शैलेश गुप्ता याला पोलिसांनी शुक्रवारीच ताब्यात घेतलं होतं.

हेही वाचा : RAIN UPDATE | उद्या पुन्हा मुसळधार

या हत्याप्रकरणातील दोघा आरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यांची कसून चौकशी पोलिसांनी केली होती. या चौकशीतूनच पोलिसांनी पिस्तुल आणि इतर गोष्टींचा सुगावा लागल्याचं कळतंय. दरम्यान, या तपासासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार केल्या होत्या. त्यांच्या मदतीनं पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवर १२ तासांतच आरोपींना अटक केली होती. दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणावरुन करण्यात आला? या हत्याप्रकरणी नेमकी सुपारी कुणी दिली होती? याबाबतही लवकरच चौकशीतून माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अमर नाईकवर अंत्यसंस्कार

दरम्यान, न्यूवाडो येथील रहिवासी अमर नाईकवर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. प्रॉपर्टीच्या वादातून हा सगळा प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय. मूळचे उत्तर प्रदेशातील असणार आणि नवी मुंबईत राहायला असणाऱ्या दोघांनी गोव्यात येऊन अमर नाईकची गोळी घालून हत्या केल्याच प्राथमिक तपासातून समोर आलंय. इसोर्शी बोगमळो येथील सागर एन्क्लेव कॉलनीजवळ गुरूवारी ही घटना घडली. शिवम सिंग वय वर्षे 22- हा युपी जौनपूर आणि आणि शैलेश गुप्ता वय वर्षे 29 हा युपीतील गोरखपूरचा आहे. शैलेश गुप्ता याने अमरवर गोळ्या झाडल्या. शैलेश हा क्रेन ऑपरेटर आहे. एका मित्राच्या आमंत्रणावरून ते गोव्यात आले होते. घटनास्थळाला दोनदा भेट देऊन त्यांनी टेहळणीही केली होती.

हेही वाचा : नोकरीच्या शोधात आहात, मग वाट कसली पाहताय? हे वाचाच!

पाहा INSIDE STORY

हेही वाचा : ACCIDENT | म्हारांगण येथे महामार्गावर अपघात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!