पुन्हा नुकसान! दक्षिणपाठोपाठ उत्तर गोव्यातही कोंबडी, अंड्यांच्या आयातीवर बंदी

बर्ड फ्लू पसरु नये म्हणून महत्त्वाचा निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : उत्तर गोव्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी बर्ड फ्लू रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तर गोव्यातही आता कोंबड्या आणि अंड्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी हा निर्णय घेतलाय. या निर्णयाच्या अनुशंगाने अंमलबजावणीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.

पुढील आदेश येईपर्यंत गोव्यामध्ये कोंबड्या आणि अंड्यांच्या आयातीवर बंदी असणार आहे. तात्काळ हा आदेश राज्यात लाहू करण्यात येणार आहे. दरम्यान, यामुळे राज्यातील अंडी आणि चिकन विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

दक्षिणे पाठोपाठ उत्तरेतही बंदी

१२ जानेवारीला दक्षिण गोव्यातही अंडी आणि कोंबड्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. कर्नाटक, महाराष्ट्रात बर्ड फ्लू पसरला असल्याने दक्षिण गोव्यात कोंबडी आणि अंड्यांच्या आयातीवर बंद आणण्यात आली होती. दक्षिणेपाठोपाठ आता उत्तर गोव्यातील तालुक्यांमध्ये अंडी आणि कोंबड्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेशही जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून येणार्‍या कोंबड्या आणि अंडी आयातीवर बंदी लागू करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर – कोंबड्या, अंड्यांच्या आयातीवर बंदी

कोरोनानंतर बर्ड फ्लूचं सावट

कोरोना काळात पोल्ट्री उद्योगाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. चिकनमुळे कोरोना पसरतो, अशी अफवा पसरवण्यात आली होती. त्यानंतर मोठं नुकसान संपूर्ण देशातील पोल्ट्री उद्योगाला सहन करावं लागलं होतं. कोरोनाची लस येण्याआधी गैरसमज दूर झाल्यानंतर लोकं पुन्हा एकदा अंडी आणि चिकनचं सेवन करुन लागले होते. आता पुन्हा एकदा नुकसान भरुन निघेल अशी आशा निर्माण होत असतानाच त्या बर्ड फ्लूनं पुन्हा एका पोल्ट्री व्यावसायिकांना हवालदिल केलंय. बर्ड फ्लूमुळे कोंबड्या आणि अंडी आयातीवर घालण्यात आलेल्या बंदी या व्यवसायाशी संबंधित सर्वच उद्योगांना मोठा फटका बसणार आहे. अंडी आणि कोंबड्यांची विक्री करणारे, त्यांची वाहतूक करणार, तसंच या सगळ्याची निर्मिती करणारे, अशा सगळ्यांच घटकांना बर्ड फ्लूमुळे मोठा तोटा पुन्हा एकदा सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा – सात राज्यांमध्ये पोहोचला ‘बर्ड फ्लू’, त्यात गोव्याचाही समावेश आहे?

केरळात कोंबड्या-पक्षांची कत्तल

अलाप्पुझा व कोट्टायम दोन्ही जिल्ह्यांत बर्ड फ्लू आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोंबडीची आणि पक्ष्यांची हत्या करण्यास सुरुवात केलीय ज्या भागात जंतुसंसर्ग आढळतो त्या भागात पोल्ट्री मांस आणि इतर संबंधित उत्पादनांच्या विक्री व वापरावर प्रशासनाने बंदी घातलीये. या भागात आणखी संसर्ग रोखण्यासाठी ३०,००० हून अधिक पक्षी मारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यातील बहुतेक पक्षी पोल्ट्री फॉर्ममधील पक्षी आहेत. त्यांना मारण्यासाठी, जाळण्यासाठी आणि दफन करण्यासाठी १० -सदस्यांची टीम तैनात केलीये. ज्या भागात व्हायरस आढळलाय तेथे एक किलोमीटरच्या परिघात घरगुती आणि पाळीव पक्षी मारले जातील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!