UPDATE | नुवे-सासष्टी येथील अपघातात 14 जणांवर गुन्हा दाखल

निष्काळजीपणाचा ठपका; मंगळवारी झाला होता अपघात; एकाचा दुर्दैवी मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः नुवे सासष्टीमध्ये मंगळवारी रस्त्यानजीकची धोकादायक झाडं कापण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू होतं. काम सुरू असल्याने झाड पडून रस्त्याने जाणाऱ्या 25 वर्षीय रिचर्ड कोस्टा याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंगळवारी रात्री पोलिसांनी १४ जणांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः VIDEO | माझ्या मतदारसंघात लुडबूड केल्यास मी गप्प बसणार नाही

नक्की कसा झाला अपघात?

मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नुवे सासष्टीत झाडं कापण्याचं काम सुरु होतं. त्याचवेळी त्या रस्त्यावरून दुचाकीस्वार रिचर्ड कॉस्टा (२५) हा तरुण मार्गस्थ होत होता. काळाचा दुर्दैवी फेरा असा की, तोडण्यात येणारं एक झाड अचानक रस्त्यावर कोसळलं आणि त्याखाली रिचर्ड सापडला. काही कळायच्या आत घडलेल्या या घटनेत दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. हा हृदयद्रावक अपघात मंगळवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास घडला.

हेही वाचाः लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

बांधकाम खात्यावर हलगर्जीपणाचा ठपका

या घटनेला बांधकाम खात्याचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर युवकाच्या मृत्यूप्रकरणी रात्री पोलिसांनी १४ जणांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Accident | 3 Killed | भीषण अपघातात अख्खं गोंयकार कुटुंब उद्ध्वस्त

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!