छत्री सोबतच ठेवा! आजपासून पुढचे 5 दिवस राज्यात पावसाची शक्यता

हवामान खात्याचा अंदाज

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एकीकडे राज्यात उकाडा वाढलाय. अशातच आजपासून पुढचे ५ दिवस राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाची दाट शक्यताय.

कर्नाटकात ९०० मीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानवरही होण्याची शक्यता आहे. पुढचे ५ दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

हेही वाचा – यावर्षी सर्वाधिक पावसाचा विक्रम, 162 इंच पाऊस

पावसाच्या शक्यतेनं आंब्याला फटका?

राज्यात गेलं वर्षभर सातत्यानं अवकाळीनं पावसानं शेतीचं नुकसान केलंय. आधी भातशेती आणि त्यानंतर सातत्यानं झालेल्या अवकाळीनं काजू, आंबा पिकांचंही नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे. महामारीत आधीच प्रचंड आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना आता पुन्हा अवकाळीमुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

हेही वाचा – Video | कणकिरे-गुळेलीला वादळाचा तडाखा, पाहा अंगावर काटा आणणारी दृश्यं

Rain 800X4520

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढलाय. मंगळवारीही राज्यातील उष्णतेचा पारा चढाच राहिला. त्यामुळे गोमंतकीयांसह पर्यटनाचा आनंद घेत असलेले पर्यटकही घामाघूम झाले. आगामी दोन दिवस उष्णता कायम राहील. त्यानंतर ढगाळ वातावरण असेल. तर, ९ आणि १० एप्रिल रोजी काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज राज्य हवामान खात्याने वर्तवला होता. दरम्यान, आता आजपासून पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यताय. दुसरीकडे पेडण्यातील काही भागात तसंच आंबोलीतही पाऊस झालाय.

हेही वाचा – पेडण्यात पावसामुळे पडझड

पणजी केंद्रात मंगळवारी कमाल तापमान ३३.९, तर किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस, तर मुरगाव केंद्रावर कमाल तापमान ३४ आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअस इतके नोंद झाले. त्याआधी सोमवारी पणजीतील कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. सलग दोन दिवस तापमानाचा पारा चढल्याने नागरिकांना गरमीचा मोठा त्रास सहन करावा लागला. उष्णतेपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी राज्यात असलेले पर्यटक आणि काही स्थानिकांनी जवळच्या समुद्र किनाऱ्याचा पर्याय निवडला. तर, करोना प्रसाराची भीती पुन्हा वाढल्याने अनेकांनी घरांत राहणेच पसंत केले.

२६ मार्चला सर्वाधिक तापमान

यंदाच्या हंगामात आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान २६ मार्च रोजी होते. या दिवशी राज्यातील कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. त्याचा फटका राज्यातील अनेक नागरिकांना सहन करावा लागला होता, अशी माहिती हवामान खात्याकडून मिळाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!