राज्यात आजपासून पुढचे पाच दिवस पुन्हा अवकाळीचं सावट

हवामान खात्याचा इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्य हवामान खात्यानं पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारपासून पुढचे पाच दिवस राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. आधीच वाढत्या कोरोनाचं संकट आणि त्यात पावसाचा अंदाज यामुळे साथरोगांना प्रोत्साहन मिळण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

बागायतदार धास्तावले

सोमवारपासून पुढचे पाच दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं भाकित हवामान खात्यानं वर्तवलं आहे. दरम्यान, सोमवारी दुपारीही ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. त्यामुळे राज्यातील उकाडाही वाढलाय. वाढलेल्या उकाड्यामुळे गोवेकर चांगलेच घामाघूम झाले आहेत. दरम्यान, आधीच मिरचीसह, आंबा आणि काजू पिकाला फटका बसल्यामुळे हातातोंडासी आलेला घासही आता अवकाळी पावसामुळे हिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि बागायतदारही धास्तावले आहेत.

पाहा मिरचीचं झालेलं नुकसान, गोवन वार्ता लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!