गारपीट आणि अवकाळीनं बेहाल, आजही बरसण्याचा अंदाज

नागरिकांची तारांबळ; केपेत गारपिठी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील सर्वच भागांत शुक्रवारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. तर केपे तालुक्यातील काही भागांत गारांचा पाऊस पडला. आजही राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे, अशी माहिती राज्य हवामान खात्याने दिली. त्यामुळे आंबा तसंच काजू पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. राज्यात शुक्रवारी झालेल्या पावसानं आधीच आंबा पिकाला धोका निर्माण झाल्यानं चिंता वाढवली आहे.

तारांबळ

वातावरणात झालेल्या बदलामुळे केरळ, कर्नाटक, गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले होते. त्याच्या प्रभावामुळे शुक्रवारी सायंकाळपासून राज्यभर पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तुरळक, काही भागांत मध्यम, तर मडगाव परिसरात पावसाने मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांची तारांबळ उडाली.

केपेमध्ये गारपीट

गोव्यात सहसा गारांचा पाऊस पडत नाही. शुक्रवारी केपे तालुक्यातील काही भागांत गारांचा पाऊस पडला. काही ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पाऊस पडल्याने तेथील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले. ज्या भागांत मध्यम आणि मुसळधार पाऊस पडला तेथे काहीवेळ ढगांचा गडगडाटही जाणवला.

आजही बरसणार?

दरम्यान, केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये झालेल्या वातावरण बदलाचा गोव्यावर प्रभाव पडून १७ फेब्रुवारीपासून राज्यातही अवकाळी पाऊस पडेल, असे राज्य हवामान खात्याने १४ फेब्रुवारी रोजी स्पष्ट केले होते. त्यानुसार गुरुवारी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला होता. पण शुक्रवारी पावसाच्या सरी कोसळल्या. शनिवारीही राज्यात ढगाळ वातावरण कायम राहून पावसाच्या सरी कोसळू शकतात, असे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ राहुल एम. यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा –

हाऊसिंग बोर्ड | 200 घरं आणि 150 प्लॉटचे दर खरंच स्वस्त आहेत का?

कामाची बातमी! 1 एप्रिलपासून तुमची इन हॅन्ड सॅलरी कमी येणार, कारण…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!