स्थानिक भाषा समजणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच भरती करा !

केंद्रीय अर्थमंत्र्यांचे राष्ट्रीय बँकांना आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : बँक कर्मचाऱ्यांनी लोकांशी स्थानिक भाषेत संवाद साधला पाहिजे. स्थानिक भाषा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच बँकांनी नियुक्ती करावी, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. इंडियन बँक्स असोसिएशनच्या ७५व्या वार्षिक बैठकीत त्या बोलत होत्या.
हेही वाचा:JOB VARTA | भारतीय कृषी संशोधन संस्थेत नोकरीची संधी…

विविधता हे देशाचे वैशिष्ट्य आहे

अर्थमंत्री सीतारामन पुढे म्हणाल्या, बँका फक्त व्यवसाय करत आहेत. ग्राहकांशी आपले सौहार्दाचे संबंध हवेत. त्यांना चांगली सेवा देता आली पाहिजे. तुम्हाला व्यवसाय करायचा असला तरी स्थानिक भाषेत संवाद साधणे गरजेचे आहे. विविधता हे देशाचे वैशिष्ट्य आहे. भारतात विविध भाषा, चालीरीती आणि पंथांचे लोक आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषांतून त्यांच्याशी संवाद साधल्यास ऐक्य निर्माण होईल. बँकांना व्यावसायिकदृष्ट्याही फायदा होईल.
हेही वाचा:JOB VARTA | गोवा राज्य जैवविविधता मंडळात नोकरीची संधी…

राष्ट्रीय बँकांना केलेल्या सूचना गोव्यासाठीही महत्त्वाच्या

स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आदी अनेक राष्ट्रीयकृत बँकांच्या गोव्यात शाखा आहेत. शहरांसह ग्रामीण भागातही त्यांचा विस्तार आहे. बहुतांश बँक कर्मचारी बाहेरील राज्यांतून आलेले असल्याने ते हिंदी किंवा इंग्रजी बोलतात. त्यांना कोकणी किंवा मराठी येत नाही. त्यामुळे गृह कर्ज, कृषीसाठीच्या योजना याविषयीची माहिती घेण्यासाठी जाणाऱ्या सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत आहे. परप्रांतांतून आलेले अधिकारी किंवा कर्मचारी गोव्याची स्थानिक भाषा कोकणी किंवा मराठी भाषेतून उत्तर देऊ शकत नाहीत, असा विविध सेवांची चौकशीसाठी गेलेल्या अनेकांचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय बँकांना केलेल्या सूचना गोव्यासाठीही महत्त्वाच्या आहेत. 
हेही वाचा:Sonali Phogat | सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी गावकर, मांद्रेकर यांना सशर्त जामीन मंजूर…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!