दुर्दैवी! रविवार ठरला घातवार

मडगावात एकाचा, तर वास्कोत दोघांचा मृत्यू; मडगावच्या चॅपेलमध्ये चोरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात रविवार हा घातवार ठरला आहे. वास्को तसंच मडगाव या ठिकाणी तीन वाईट घटना घडल्या असल्याची माहिती हाती येतेय. वास्को दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय, तर मडगावात एकाला रेल्वेच्या धडकेत मरण आलंय. तसंच मडगावातील एका चॅपेलमध्ये चोरी झाल्याचा प्रकार घडलाय.

हेही वाचाः कोरोना रुग्णांमध्ये ‘बोन डेथ’ लक्षणांमुळे डॉक्टर चिंतेत

वास्कोत दोघांचा बुडून मृत्यू

वास्कोतील उतोर्डा समुद्रात रविवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास दोन तरुण बुडाले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती वेर्णा पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली. हे तरुण फातोर्डा येथील असल्याचं सांगण्यात आलंय.

हेही वाचाः आमदाराच्या भावाने काँग्रेस प्रवेश केला; आमदार कधी करणार?

मडगावात रेल्वेच्या धडकेत एकाला मरण

मुंगूल मडगाव येथे रेल्वेची धडक बसल्याने एक ३० वर्षीय अज्ञात युवक जागीच ठार झाला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमाराला घडली. मयताचा मृतदेह सरकारी शवागृहात ठेवलेला असून उपनिरीक्षक अरुण तळेकर या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

हेही वाचाः मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामींचं निधन

मडगावातील चॅपेलमध्ये चोरी

मडगावातील जुन्या मार्केटमधील सिडल अल्मास चॅपेलमध्ये चोरी होण्याचा प्रकार घडला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आणि रविवारी सकाळी चपेलचं कुलूप तोडून फंडपेटीतील पैसे चोरील गेल्याचं उघडकीस आलं. फातोर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चॅपेलचा मुख्य प्रवेशव्दार, त्यानंतर दरवाजा तोडून चोरट्यांनी चॅपेलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चॅपेलमधील फंडपेटी फोडून त्यातील पैसे चोरून पळ काढला. फंडपेटीतील रक्कम जास्त नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. मात्र, गेल्या नऊ महिन्यात सिडल अल्मास चॅपैलमध्ये चोरी होण्याची ही दुसरी घटना असल्याचं उपस्थितांनी सांगितलं. फातोर्डा पोलिसांशी संपर्क साधला असता, अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस तपास करत असल्याचं सांगण्यात आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!