ड्रग्ज सप्लायचं अंडरवर्ल्ड कनेक्शन ; दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर ‘एनसीबी’च्या ताब्यात !

ड्रग्ज कनेक्शनसोबत दहशतवादी फंडींगचेही धागेदोरे 'एनसीबी'च्या हाती !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गेल्या काही दिवसात ‘एनसीबी’नं मुंबईत अंमली पदार्थविरोधात धडक मोहीम राबवली होती. त्यात सुमारे 17 किलोपेक्षा अधिक चरस जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणाच्या अधिक तपासानंतर ड्रग्ज सप्लायचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड झालंय. या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ‘एनसीबी’नं ठाणे कारागृहातून ताब्यात घेतलंय. दरम्यान, केवळ ड्रग्स पुरवठा नव्हे तर दहशतवादी फंडिंगबाबतही महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं समजतं.

आठवडयापूर्वीच एनसीबीनं मुंबई आणि ठाणे इथं दोन मोठे छापे टाकले होते. यात 17.3 किलो चरस जप्त करण्यात आलं होतं. या कारवाईत सात जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. चौकशीनंतर हे चरस जम्मु-काश्मिर इथुन आल्याचं स्पष्ट झालं होतं. अधिक तपासात या प्रकरणाचे धागेदोरे थेट अंडरवर्ल्डपर्यंत पोहोचले.

अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर या प्रकरणात सहभागी असल्याचं तपासात पुढं आलं. केवळ अंमली पदार्थ रॅकेट नव्हे तर दहशतवादी फंडींगचेही धागेदोरे यात आढळून आले आहेत. त्यामुळं सध्या ठाणे कारागृहात असलेल्या इक्बाल कासकर याला एनसीबीनं ताब्यात घेतलंय. दरम्यान, या तपासातुन धक्कादायक माहिती एनसीबीच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!