कोलवाळ जेलमधील अंडर ट्रायल कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू

रविवारी रात्री पडला बेशुद्ध; उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सकडून मृत घोषित

Goan Varta Live | प्रतिनिधी

कोलवाळः कोरोनामुळे दरदिवशी मृतांमध्ये होणारी वाढ ही कायम आहे. तसंच ती चिंतेची बाब बनत चालली आहे. शहरांमधून हळुहळू कोरोनाने ग्रामीण भागात प्रवेश केला. आता तर कोरोना जेलमधील कैद्यांमध्येही आढळून येतोय. रविवारी कोलवाळ येथील जेलमधील एका कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता जेल प्रशासनामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हेही वाचाः घरोघरी जाऊन कोरोनासंबंधीच्या चाचण्या, तपासणी करा !

कोलवाळ जेलमध्ये कैद्याचा मृत्यू

रविवारी रात्री कोलवाळ जेलमध्ये एका कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती हाती आली आहे. या अंडर ट्रायल कैद्याचं नाव यल्लप्पा करबल असल्याचं समजतंय. यल्लप्पाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचं समजल्यानंतर जेल प्रशासनामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हेही वाचाः सलग तिसऱ्या दिवशी रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचं समोर!

रात्री बेशुद्ध पडला

रविवारी रात्री यल्लप्पा करबल चक्कर येऊन जेलमध्ये बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडल्यानंतर जेल प्रशासनाने तातडीने धावपळ करून त्याला उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात भरती केलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर यल्लपाला मृत घोषित केलं. तसंच त्याचा मृत्यू कोविडमुळे झाला असल्याचं सांगितलं.

हेही वाचाः रेमेडेसिवीरच्या तुटवड्यामुळे रूग्णांची परवड

काही दिवसांपूर्वी झाली होती कोविडची लागण

खुनाच्या आरोपात कोलवाळ जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या यल्लपाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोविडचा संसर्ग झालेल्या कैद्यांसाठी जेलमध्ये एक स्पेशल सेल तयार करण्यात आली आहे. त्या सेलमध्ये यल्लपाला ठेवण्यात आलं होतं. रविवारी रात्री तो अचानक बेशुद्ध पडल्यानंतर त्याला उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं.

हेही वाचाः DRDO सोमवारी लाँच करणार डीजी अँटी कोविड औषध

खुनाचा आरोपा खाली शिक्षा भोगणाऱ्या यल्लपावर मडगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला सुरू होता.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!