कोविड मृत फ्रंटलाईन योद्ध्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांचे वाटप

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कोविड मृत फ्रंटलाईन योद्ध्यांच्या कुटुंबांना ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजने’तून प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक साहाय्य वितरीत केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिलीये.

हेही वाचाः बालभवनचा ऑनलाईन गुणदर्शन कायर्क्रम संपन्न; 7 जून ते 10 जुलै कार्यक्रमाचं आयोजन

मुख्यमंत्र्यांचं ट्विट

ट्विट करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी लिहिलंय, कोविड महामारीत राज्यात आपलं कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या कोविड फ्रंटलाइन योद्ध्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये वितरित केले आहेत.

कोविड मृतांच्या कुटुंबांना मदत

कोविड -१९ मध्ये कुटुंबातील कमावता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना केंद्र सरकारने आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा केली होती. या मदतीत कौटुंबिक पेन्शन आणि विमा लाभांचा समावेश आहे. एका निवेदनात पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) म्हटलं आहे, की कोविड -१९ च्या काळात कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आणि त्यांचं जीवनमान उत्तम राखण्यासाठी, रोजगार-संबंधित मृत्यू प्रकरणांसाठी कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) पेन्शन योजनेच्या फायद्याची मुदत वाढविण्यात आली आहे.

हेही वाचाः गोव्याचा बिहार होतोय का? बोगमळोत एकावर गोळीबारानं खळबळ

मागील वर्षाच्या २४ मार्च पासून हा लाभ संबंधित कुटुंबाना देण्यात आला आहे आणि २४ मार्च २०२२ पर्यंत अशा सर्व प्रकरणांसाठी ही योजना उपलब्ध असणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!