माडेल-थिवी चोरीप्रकरणी दोन चोरट्यांना अटक…

दुकान मालकाची कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : माडेल-थिवी येथील मोबाईल विक्री व दुरूस्ती दुकान फोडून ६४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरी प्रकरणी अभिषेक कुमार सिंग (२३, रा. बिहार) व कल्याण कमल हॅण्डीकी (२६, रा. आसाम) या दोघा संशयितांना अटक केली आहे. कोलवाळ पोलिसांनी या प्रकरणाचा यशस्वी छडा लावला. ही चोरीची घटना मागील बुधवारी दि. ३ रोजी मध्यरात्री घडली होती. गुरूवारी सकाळी दुकान फोडल्याचे दिसून येताच दुकान मालक सुर्यकांत कामत (तोरसे) यांनी कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा:Panchayat Election | कळंगुट प्रभाग ९ मध्ये आज मतदान, कारण…

चोरीतील मुद्देमाल जप्त

संशयितांनी माडेल येथील ग्रीनलॅण्ड रेस्टॉरन्ट जवळील साईश्रध्दा रीसेल आणि रिपेअरींग या दुकानाचे शटर वाकवून दुकानात चोरी केली होती. दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे दोन नवीन व पाच जुने मोबाईल मिळून ६३ हजारांचे सात मोबाईल फोन आणि दीड हजार रुपये रोकड मिळून एकूण ६४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून केला होता. हा सर्व चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी संशयितांकडून जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंदार परब, हवालदार रामा नाईक, कॉन्सटेबल सुरेश नाईक व साज्जो देसाई या पथकाने कॉल मोनीटरींग सेलच्या सहाय्याने माहिती गोळा केली व संशयितांना कुंडई-फोंडा येथून अटक केली.
हेही वाचा:लोकशाही जपायला विसरू नकोस!

संशयित कुंडई वसाहतीत कामास

संशयित आरोपी अभिषेक व कल्याण हे दोघेही कुंडई औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत कामाला होते. ते कुंडई येथेच भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. संशयितांचा इतर काही चोरींच्या प्रकरणात हात असल्याची संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 
हेही वाचा:भाजपाशी काडीमोड घेत नितीश कुमार यांनी घेतली आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!